Shirur News शिरूर : राष्ट्रवादी कॅाग्रेस पक्षाने जनतेचे, शेतकऱ्यांचे, राज्याचे, देशाचे प्रश्न मांडण्याची संधी मला प्राप्त करून दिली आहे. शिरूर लोकसभा मतदार संघात राष्ट्रवादी कॅाग्रेसचे जेष्ठ नेते शरद पवार यांचे वेळोवेळी मार्गदर्शन मिळाले आहे. पण सध्याची राजकिय परिस्थिती पाहून लोकशाहितील तत्व , मुल्य, लोकप्रतिनिधीची जबाबदारी, उत्तरदायीत्व, नैतीकता, आणि विश्वाससार्हता या गोष्टीविषयी संभ्रम झाला आहे. त्यामुळे (Shirur News) शिरूर लोकसभा खासदारकीचा राजीनामा देण्याच्या विचारात आहे. असे भावनीक पत्र शिरूर लोकसभेचे खासदार डॅा. अमोल कोल्हे यांनी जेष्ट नेते शरद पवार यांना दिले आहे. (Shirur News)
खासदार डॅा. अमोल कोल्हे यांनी जेष्ट नेते शरद पवार यांना दिले पत्र
याबाबत खासदार अमोल कोल्हे यांनी शरद पवार यांच्याशी भेट घेऊन चर्चा केली. यावेळी पवार यांना दिलेल्या पत्रात ते म्हणतात की, कलाकार म्हणून मी सर्वाधिक भूमीका छत्रपती शिवाजी महाराज व संभाजी महाराज यांच्या केल्या आहेत. रयतेचे राज्य म्हणणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श समोर ठेवून मी राजकारणात आलो आहे.(Shirur News)
सध्याची राजकिय परिस्थिती पहाता पक्ष फोडणे, आमदारांची पळवापळवी, काहिही करून सत्ता मिळवण्याचा अट्टहास हे पाहून मनात संभ्रम निर्माण झाला आहे. मतदारांनी ठेवलेला विश्वास, सुशिक्षीत तरूणाईचा मनात सत्तेसाठी घडत असलेल्या घटना यांचे शल्य मनात बोचत आहे. पदाचा मोह न बाळगता लोकशाही मुल्ये टिकवण्याच्या आपल्या संघर्षात एक कार्यकर्ता म्हणून निश्चित सहभागी असेन, असेही कोल्हे यांनी या पत्रात म्हटले आहे.(Shirur News)