Shirur News शिरूर : आंबेगाव, जुन्नर आणि शिरूर तालुका ८५ टक्के बागायत करण्यात राष्ट्रवादी कॅाग्रेस पक्षाचा मोठा वाटा आहे. कारण धरणात पावसाचे अडवलेले पाण्याचे व्यवस्थापन केल्याने या भागातील जनतेला पाण्याचा लाभ झाला आहे. मात्र डिंभा धरणात बोगदा करून पाणी नेल्यास या भागाला पुन्हा दुष्काळाच्या झळा सोसाव्या लागणार आहेत. हा जनतेचा प्रश्न नेहमी मांडला तसेच त्यासाठी प्रशासकीय पातळीवर निवेदन दिले आहेत. मात्र यावर तोडगा काढला नाही. त्यामुळेच मतदार संघातील जनतेच्या हितासाठी मला वेगळा निर्णय घ्यावा लागला आहे. असे कॅबीनेट मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी सांगितले. (Shirur News)
आंबेगाव तालुक्यातील मंचर येथे रविवारी ( ता. ९ ) शिवगिरी मंगल कार्यालयात झालेल्या राष्ट्रवादी कॅाग्रेस पक्षाच्या मेळाव्यात ते बोलत होते.(Shirur News)
विकासाची गंगा आणण्यात पवार यांचा मोलाचा वाटा .
वळसे पाटिल म्हणाले की, आमदार रोहित पवार अजून लहान आहेत. कर्जत -जामखेड विधानसभा मतदार संघामधील जनतेचा प्रश्न असेल तर मी आमदारकी सोडतो. तुम्ही आंबेगाव- शिरूर मतदार संघात उभे रहा आणि जनतेचे प्रश्न सोडवा. माझे भांडण पवार कुटूंबाशी अजीबात नाही. मला साहेबांनी काही कमी पडू दिले नाही. त्या बरोबर मी देखील मतदार संघातील जनतेवर प्रेम करत त्यांना काहिच कमी पडू दिले नाही. त्यामुळे जनता माझ्या पाठिशी सातत्याने उभी आहे. त्यामुळेच साहेबांचे आम्ही कृतज्ञ आहोत.(Shirur News)
पण रोहित पवार हे काल राजकारण आले आहेत. मला सामाजीक कार्यात येऊन ४० वर्षे झाली आहेत. त्यांचे वय अवघे ३७ आहे. मी यापुढेही सामाजीक कार्य करत असताना जनतेच्या हितासाठी काम करत राहणार आहे. मी जे आज घडलो आहे. जो विकासाचा महामेरू उभा राहिला आहे. तो फक्त जेष्ट नेते शरद पवार यांच्यामुळे झाला आहे. त्यांच्या विरोधात आपली लढाई नाही. मी राष्ट्रवादी पक्ष सोडला नसून भाजप मध्ये प्रवेश केलेला नाही. जनतेत अफवा पसरवणाऱ्यांवर विश्वास ठेवू नका.(Shirur News)
डिंभा धरणात बोगदा केल्यास धरणे कोरडे पडतील आंबेगाव, शिरूर, जुन्नर व पारनेर तालुक्यातील ६५ बंधारे पाण्या अभावी कोरडे पडतील. या भागातील शेती व्यवसाय धोक्यात येईल. मला ईडी, इन्कमटॅक्स किंवा सीबीआयची नोटीस नाही. अफवा पसरवणाऱ्यांवर विश्वास ठेवू नका. जनकल्याणासाठी मी जनतेसोबत असून तुमच्या प्रश्नांसाठी उपमुख्यमंत्री अजीत पवार यांच्या सोबत राज्य सरकार मध्ये सहभागी आहे. यापुढेही अनेक विकासाची कामे आपल्याला करावयाची आहेत.(Shirur News)
भिमाशंकर कारखान्यावर दहा वर्षे सत्ता दिली. सात वर्षे बाजार समितीचे सभापती केले. एकदा लोकसभेची उमेदवारी दिली. सत्ता उपभोगून देखील पुन्हा नाराजी दर्शवित बाजार समिती साठी इच्छूक झाले. इतरांनाही संधी दिली गेल पाहिजे. पण आम्हीच सत्तेत पाहिजे असे म्हणत पक्षाच्या विरोधात निवडणूक लढवायची. त्यातून गावागावात गटतट निर्माण करायचे. असे नाव न घेता वळसे पाटील यांनी माजी सभापती देवदत्त निकम यांना सुनावले.(Shirur News)
दरम्यान, जेष्ठ नेते शरद पवार यांची मंचर ला सभा झाल्यास सर्व कार्यकर्त्यांनी सभेस जावे. कारण राज्याच्या कारणात जनतेच्या समस्या सोडविण्यात व विकासाची गंगा आणण्यात पवार यांचा मोलाचा वाटा आहे. असेही वळसे पाटील यांनी सांगितले.(Shirur News)