Shirur News शिरुर : शरदवाडी (ता. शिरुर) येथील हनुमान विवीध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या अध्यक्षपदी जनार्दन चंद्रकांत सरोदे यांची तर उपाध्यक्षपदी गणेश पोपट गांजे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. त्यांच्या या निवडीने परीसरातून त्यांचे अभिनंदन केले जात आहे. (Shirur News)
जांबुत येथील संस्थेच्या कार्यालयात हि निवडनुक प्रक्रिया पार पडली. हि निवडणूक प्रक्रिया निवडणूक निर्णय अधिकारी डी.वाय.वराळ यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या निवडणुकीत अध्यक्षपदी जनार्दन सरोदे यांची तर उपाध्यक्षपदी गणेश गांजे यांची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली. (Shirur News)
यावेळी सरपंच हरिभाऊ सरोदे, उपसरपंच विठ्ठल सरोदे , जांबुत सोसायटी अध्यक्ष बाळासाहेब पठारे, सोसायटीचे माजी अध्यक्ष वासुदेव सरोदे, विश्वास सरोदे, किसन गांजे, प्रशांत जोरी, कोंडीभाऊ पोकळे, रामदास सरोदे, संगिता सरोदे, सुनिता राऊत,माजी उपसरपंच गणेश सरोदे, अशोक गांजे डॉ बिभीषण औटी, बाबुराव जोरी, माऊली सरोदे, सुभाष सरोदे व संस्थेचे सचिव कुशाभाऊ जोरी, आजी माजी पदाधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी बोलताना नवनिर्वाचित अध्यक्ष जनार्दन सरोदे म्हणाले कि, आगामी काळात सोसायटीचा कारभार पारदर्शकपणे करणार आहे. तसेच सर्व सदस्यांना एकत्र घेऊन सोसायटीचा विकास करण्यासाठी प्रयत्न करणार आहे.