अजित जगताप
Shirdi News : शिर्डी: दलित पँथरचे कार्यकर्ते ते केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री असा प्रवास करणारे रामदास आठवले यांच्या मार्गदर्शनाखाली रिपब्लिकन पक्षाचे दोन दिवसीय अधिवेशन शनिवारपासून (ता. २७) सुरू झाले आहे. शिर्डीचे साईबाबा यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या भूमीत रिपब्लिकन पक्षाचे नेते व कार्यकर्ते सहभागी झाले आहेत. (Western Maharashtra’s focus on the Republican party’s National Convention)
महाराष्ट्र राज्यातील शहरे व गावे याठिकाणी आठवले या नेत्यांवर विश्वास ठेवून अनेक मान्यवरांनी रिपब्लिकन पक्ष वाढविला आहे. पण, सत्तेचा विस्तार होऊ शकला नाही. (Shirdi News )काँग्रेस, राष्ट्रवादी काँगेस पक्ष, शिवसेना, भाजप या प्रमुख पक्ष नेत्यांनी स्थानिक पातळीवर कार्यकर्त्यांचा वापर केला. आज राजकीय दृष्ट्या संवेदनशील परस्थिती निर्माण झाली आहे. याचा गांभीर्याने विचार करावा लागणार आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही निमंत्रण
नागालँडमधून या पक्षाचे दोन आमदार एलिमा वन चांग व लिमटिचाबा चांग निवडून आले आहेत. हे अधिवेशनाचे मुख्य आकर्षण ठरले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासह जिल्ह्यातील भाजपच्या खासदार व आमदारांना या अधिवेशनात निमंत्रित करण्यात आले आहे. (Shirdi News ) त्यांनी रिपब्लिकन पक्षाच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांचा विचार केला पाहिजे.
सातारा जिल्ह्यातील येथून सुमारे दोन हजार कार्यकर्ते या अधिवेशनासाठी हजर राहणार आहेत, असे जिल्हाध्यक्ष अशोक बापू गायकवाड यांनी सांगितले.(Shirdi News) तत्पुर्वी महिला पदाधिकारी पूजा बनसोडे, वैभव गायकवाड, राजेंद्र माने, आप्पा तुपे, संजय लादे,सुरेश यवले, डॉ सपंत कांबळे,अशोक मदने, एकनाथ रोकडे, प्राणलाल सोनवणे, विकास जाधव यांनी अधिवेशनात उपस्थित राहिले आहेत.
सातारा जिल्ह्यातील युवा कार्यकर्ते प्रतीक गायकवाड व शेजवळ मित्र समूहाने शिर्डी येथे कार्यक्रमाच्या ठिकाणी जोरात बॅनर बाजी करून सर्वांचे लक्ष वेधले आहे. रिपब्लिकन पक्षाचे नेते व कार्यकर्ते यांनी शिर्डी येथील अधिवेशनात उपस्थित राहून नेत्यांवर विश्वास दाखविला आहे. तशा पद्धतीने कार्यकर्त्यांना संधी मिळाली पाहिजे. यासाठी नेत्यांनी ही प्रामाणिकपणे प्रयत्न केला पाहिजे. असा सूर उमटत आहे.
सातारा जिल्ह्यातील बौद्ध बांधव हे नेहमीच रिपब्लिकन पक्षाच्या सोबत होते. आता काळ बदलला आहे. भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँगेस पक्ष, काँग्रेस पक्षाचे काम काही बौद्ध बांधव उघडपणे करू लागले आहेत. तरी ही त्या पक्षात त्यांची गळचेपी होत आहे. तर दुसऱ्या बाजूला आदरणीय ॲड. प्रकाश आंबेडकर, डॉ राजेंद्र गवई, जोगेंद्र कवाडे , दिपक निकाळजे, आनंद राज आंबेडकर, राजाराम खरात अशा अनेक मान्यवरांच्या गटात विलीनीकरण करून काम करीत आहेत.(Shirdi News ) रिपब्लिकन पक्ष सर्व जाती धर्मातील बंधू साठी आहे. हे त्रिवार सत्य असेल तरी एक दोन जाती धर्मात बंदिस्त झाला आहे. हे कधी ही नाकारू शकत नाही. व्यापक अर्थाने भारतामध्ये रिपब्लिकन पक्ष वाढविणे आवश्यक आहे. तरच भविष्यात हा पक्ष सत्तेत वाटेकरी बनेल. असे चित्र अधिवेशनात दिसून यावे ही संकल्पना राबवावी असे सूचित करण्यात येत आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Shirdi Saibaba : शिर्डीच्या साईबाबा मंदिरात आता वशिलेबाजी बंद ; आरती पाससाठी हा नियम होणार लागू..
Indapur News : इंदापूर महाविद्यालयाचा वाणिज्य शाखेचा निकाल ९१ टक्के; तर, कला शाखेचा निकाल ७० टक्के