Shirdi News : शिर्डी : संजय राऊत यांच्यासारखे लोक सतत बोलत असतात. त्यांच्या बोलण्याकडे कोणीही लक्ष देत नाही, त्यांचं बोलणं गांभीर्यानं देखील घेत नाही. मात्र, विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्याबद्दल मला अतिशय आदर आहे. कारण दादा जबाबदार नेते आहेत. दादा बोलतात ते जनता गांभीर्याने घेते. दादांनी सरकारमध्ये यावे ही आमची अपेक्षा आहे, अशी थेट खुली ऑफर राज्याचे मंत्री आणि शिंदे गटाचे नेते दीपक केसरकर यांनी अजित पवार यांना दिली. आता अजित दादा या ऑफरवर काय बोलतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
त्यांच्या कामाचा फायदा राज्यातील जनतेला झाला पाहिजे
दीपक केसरकर हे शिर्डीत आले असता, त्यांनी माध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधला. या वेळी बोलताना केसरकर म्हणाले की, सामाजिक ऐक्य राखण्यामध्ये दादा आमच्याबरोबर आघाडीवर असतील याची मला खात्री आहे. (Shirdi News) दादा हे कार्यक्षम नेते आहेत. त्यांच्या कामाचा फायदा हा राज्यातील जनतेला झाला पाहिजे, असंही ते म्हणाले.
कोल्हापुरात जी दंगल घडली त्यात एकही माणूस शहरातील नव्हता. बाहेरून आलेले हे लोक होते. दंगल होणार हे नेत्यांना अगोदर कसं कळतं? सामाजिक ऐक्य राखणं सर्वांचंच काम आहे. (Shirdi News) तुम्ही दंगली भडकवणार आणि आमच्यावर आरोप करणार हे चालणार नाही. दंगली करणारे सत्तेवर बसले तर दंगली होणारच नाहीत. आता त्यांनी दंगली केल्या असं मी म्हणत नाही, असंही दीपक केसरकर म्हणाले.
यावेळी केसरकर यांनी भाजप खासदार अनिल बोंडे यांच्यावरही टीका केली. स्वत:च्या मुख्यमंत्र्यांना बेडूक म्हणणे म्हणजे महाराष्ट्राचा अपमान आहे, अशा शब्दांत त्यांनी बोंडे यांना सुनावले. (Shirdi News) यावेळी त्यांनी केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारावरही भाष्य केलं. केंद्रात आम्हाला 100 टक्के मंत्रिपद मिळणार आहे. काही खाती रिक्त आहेत. त्याचा विचार होईल. कोणतं खातं मिळेल हे पंतप्रधान नरेंद्र मोदीच ठरवतील. मात्र, जी संधी मिळेल त्याचा महाराष्ट्रासाठी उपयोग करू, असंही त्यांनी स्पष्ट केलं.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Shirdi News : रिपब्लिकन पक्षाच्या राष्ट्रीय अधिवेशनाकडे पश्चिम महाराष्ट्राचे लक्ष
Shirdi Saibaba : शिर्डीच्या साईबाबा मंदिरात आता वशिलेबाजी बंद ; आरती पाससाठी हा नियम होणार लागू..