(Maharashtra Budget 2023) मुंबई : शिंदे-फडणवीस सरकारच्या पहिल्या अर्थसंकल्पाकडे राज्यातील जनतेचे लक्ष लागले होते. आज अखेर राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री देवेंद्रे फडणवीस यांनी अर्थसंकल्प (Maharashtra Budget) सादर केला आहे. या अर्थसंकल्पात फडणवीस यांनी महिला आणि बालक यांच्या बद्दल अर्थसंकल्पातील विविध तरतुदी जाहीर केल्या. यावेळी त्यांनी अर्थसंकल्पात शिंदे सरकारकडून नव्या ‘लेक लाडकी’ ही योजना जाहीर केली आहे.
काय असेल या योजने ??….
– पिवळ्या व केशरी रेशन कार्ड कुटुंबातील मुलीच्या जन्मानंतर 5000 रुपये.
– इयत्ता चौथीत गेल्यावर 4000 रुपये
– सहावीत गेल्यावर 6 हजार रुपये
– अकरावीत 8 हजार रुपये अनुदान दिले जाणार
– लाभार्थी मुलीचे वय 18 वर्षे पूर्ण झाल्यानंतर तिला 75 हजार रुपये दिले जातील.
अर्थमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी शिंदे सरकारचा पहिलाच अर्थसंकल्प आज विधानसभेत सादर केला. तर, दीपक केसरकर यांनी विधानपरिषदेत अर्थसंकल्प सादर केला.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Pune Crime News : पुण्यात मासिक पाळीत महिलेशी अघोरी कृत्य; विश्रांतवाडीतील घटना!