पुणे : रेशन कार्ड धारकांसाठी शिंदे-फडणवीस सरकारने दिवाळी गिफ्ट आणले आहे. शिधा पत्रिका धारकांना शिधा वस्तूंचे दिवाळी पॅकेज मिळणार आहे. रवा, चणाडाळ, साखर आणि तेल यांचे प्रत्येकी एक-एक किलोचे पॅकेज अवघ्या शंभर रुपयात मिळणार आहे. त्यामुळे अनेक कुटुंबांची दिवाळी गोड जाणार आहे.
१ कोटी ७० लाख कुटुंबांना म्हणजेच ७ कोटी लोकांना या निर्णयाचा प्रत्यक्ष लाभ होणार आहे. शिधा पत्रिका धारकांना रवा, चणाडाळ, साखर व तेल (प्रत्येकी एक किलो पॅकेज) केवळ शंभर रुपयांत दिले जाणार आहेत. अन्न व नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाने हा निर्णय घेतला आहे.
राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीतील निर्णय
दरम्यान, आपत्ती व्यवस्थापनातील प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी केंद्र किंवा राज्य सरकारच्या कंपन्यांना प्रकल्प अंमलबजावणी यंत्रणा म्हणून नेमणार
(मदत व पुनर्वसन विभाग)
पोलिस दलातील अधिकारी आणि अंमलदारांना पूर्वीप्रमाणेच घरबांधणीसाठी बँकांमार्फत कर्ज देणार
(गृह विभाग)
नागपूर मेट्रो रेल प्रकल्पास गती मिळणार. सुधारित खर्चास मान्यता.
(नगर विकास विभाग)
भंडारा जिल्ह्यातील सुरेवाडा उपसा सिंचन योजनेस गती देणार. योजनेस सुधारीत प्रशासकीय मान्यता.
(जलसंपदा विभाग)
उस्मानाबाद आणि बीड जिल्ह्यातील कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्पास गती देणार. खर्चास सुधारित मान्यता. ८ दुष्काळी तालुक्यांना फायदा