पुणे Politics News : शरद पवार यांचा राजीनामा हा राष्ट्रवादी काँग्रेसचा तीन दिवसांचा खेळ होता महाराष्ट्रात जी नौटंकी झाली, ती म्हणजे घरगुती तमाशातील वगनाट्य होते, अशी टीका भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली.(Politics News) ही सगळी स्क्रिप्ट होती हे माहीतच होत, असेही ते म्हणाले. ते पुणे येथे संघटनात्मक दौऱ्यावर असतांना माध्यमांशी बोलत होते. (Politics News)
बावनकुळे म्हणाले, राष्ट्रवादीला प्रसिद्धीच्या झोतात राहायचं होत त्यासाठी त्यांनी ही नौटंकी केली. शरद पवारांनी अध्यक्ष होण्यासाठी कर्मवीर भाऊराव पाटील यांनी उभ्या केलेल्या रयत शिक्षण संस्थेची घटना बदलली. अशा वेळी त्यांनी स्वतः उभा केलेल्या पक्षाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा कसा देतील.
दुसऱ्यांनी उभ्या केलेल्या सहकारी साखर कारखाने, सहकारी संस्था, शिक्षण संस्थांचे अध्यक्ष होण्यासाठी ज्या लोकांनी घटना बदलली ते स्वतःच्या पक्षाचा अध्यक्ष दुसऱ्याला कस होऊ देतील. रयत हे फक्त एक उदाहरण आहे, अशी 50 नावं आपल्याला सांगता येतील.
अजित पवार मविआच्या टार्गेटवर
आमदारांच्या निलंबनावर या आठवड्यात निकाल येण्याची शक्यता आहे. उद्या जर विधानमंडळात बहुमत सिद्ध करायला सांगितले तर माझा दावा आहे 184 पेक्षा जास्त बहुमत आमच्याकडे आहे. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वात ऑक्टोबर 2024 पर्यंत आमचं सरकार टिकेल आणि 2024 च्या विधानसभा निवडणुकीत भाजप-सेनेच्या युतीला 200 पेक्षा जास्त जागा मिळतील’ असेही बावनकुळे यांनी म्हटले. अजित पवार हे भाजपाच्या संपर्कात नसल्याचा दावाही त्यांनी यावेळी केला, अजित पवार यांना महाविकास आघाडीकडूनच टार्गेट केले जात असल्याचे त्यांनी सांगितले.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Breaking News : शरद पवार निर्णय बदलणार ? अजित पवार म्हणाले
Big Breaking : शरद पवार आणि गौतम अदानी यांच्या भेटीमुळे राजकारणात खळबळ