मुंबई: लोकसभा निवडणुकीनंतर (Lok Sabha Elections) अनेक प्रादेशिक पक्ष काँग्रेसच्या जवळ येतील, तर काही पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होतील, असं वक्तव्य राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी केलं. येत्या काळात राजकारणात मोठे बदल पाहायला मिळतील असे संकेतही शरद पवारांनी दिले. यावेळी ‘इंडियन एक्स्प्रेस’ला दिलेल्या मुलाखतीत शरद पवार यांनी येत्या काळातील राजकारणावर सविस्तर भाष्य केलं आहे.
येणा-या पुढील दोन वर्षांमध्ये अनेक प्रादेशिक पक्ष काँग्रेसच्या जवळ येतील. तसेच आपल्या पक्षाचे हित ओळखून काही पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होण्याचा पर्याय स्वीकारतील,’ असं भाकित शरद पवारांनी केलम आहे. मग हाच निकष तुमच्या राष्ट्रवादी काँग्रेस शरचचंद्र पवार पार्टी या पक्षासाठी लागू होईल का, असा प्रश्न शरद पवार यांना विचारण्यात आला. त्यावर पवार म्हणाले, काँग्रेस आणि आमच्यामध्ये फारसा फरक नाही. आमची विचारधारा ही सारखीच आहे. आम्ही गांधी, नेहरु यांची विचारधारा मानतो.
या मुलाखतीमध्ये शरद पवार यांनी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) व त्यांच्या शिवसेनेबाबतही (Shivsena UBT) भाष्य केले. शरद पवार म्हणाले, उद्धव ठाकरे काँग्रेस आणि राष्ट्रवादीसारख्या समवीचारी पक्षांबरोबर काम करण्यास सकारात्मक आहेत. उद्धव ठाकरेंचे विचारही आमच्यासारखेच आहेत. सध्या सुरू असलेल्या लोकसभा निवडणुकांदरम्यान त्यांना जाणवले की, महाराष्ट्रात सत्ताधारी भाजव विरोधात वातावरण आहे. त्याचप्रमाणे उत्तर प्रदेशासह देशातील इतर भागांतही भाजपविरोधात वातावरण असल्याचे शरद पवार यांनी सांगितले.
शरद पवार यांनी प्रादेशिक पक्षांबाबत केलेले हे वक्तव्य अनेक अर्थांनी महत्त्वाचे मानले जात आहे. समाजवादी पक्ष, राजद, लोजप, वायएसआरसीपी, टीडीपी आणि भारत राष्ट्र समिती या प्रादेशिक पक्षांमध्ये जुन्या पिढीकडून नव्या पिढीकडे नेतृत्व हस्तांतरित होत असताना शरद पवार यांनी हे वक्तव्य केलेलं आहे.