अमरावती : येथे लोकसभा निवडणुकानिमित्त माजी कृषी मंत्री शरद पवार (Sharad Pawar) महाविकास आघाडीचे उमेदवार बळवंत वानखेडे यांच्या प्रचारासाठी आले होते. यावेळी उद्धव ठाकरे(Uddhav Thackeray), यशोमती ठाकूर (Yashomati Thakur) आदी दिग्गज नेते उपस्थित होते.
यावेळी शरद पवार म्हणाले, आज मी याठिकाणी आलोय ते म्हणजे अमरावतीकरांची माफी मागायला. कारण मागील पाच वर्षांपूर्वी लोकसभेच्या उमेदवाराला मतदान करा म्हणून मी काही सभा घेतल्या होत्या. त्यावेळी लोकांनी माझा संदेश स्वीकारला व आम्ही ज्यांना पाठींबा दिला त्यांना खासदार केले. पण गेल्या पाच वर्षांतील या खासदारांचा अनुभव पाहिल्यानंतर माझ्या मनात अस्वस्थता होती. त्यामुळे मला सतत वाटायचे की, कधीतरी जावे आणि अमरावतीकरांची माफी मागावी आणि त्यांना सांगावं आमच्याकडून चूक झाली. ती चूक आता पुन्हा कधीही होणार नाही.
यावेळी आपल्या भाषणात शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर (Narendra Modi) परखड शब्दांत टीका केली. देशातील सत्ता ही पंतप्रधान मोदींच्या हातात आहे. गेली १० वर्षं आपण पाहतोय. अनेक ठिकाणची त्यांची भाषणं ऐकतोय. काय सांगतात ते हल्ली?” असा प्रश्न त्यांनी उपस्थितांना केला. आजचे पंतप्रधान मोदी हे कुठेही गेल्यानंतर पहिल्यांदा पंडित जवाहरलाल नेहरूंवर टीका करतात. काँग्रेसवर टीका करतात”, असेही शरद पवार म्हणाले. त्यांना माहिती हवे की, स्वातंत्र्यासाठी जवाहरलाल नेहरू यांनी 18 वर्षांचा तुरुंगवास भोगलेला आहे. स्वातंत्र्यानंतर देश लोकशाही पद्धतीने कसा चालवावा यासाठी रचणा केलीय. त्यामुळे पंडित जवाहरलाल नेहरू यांचे योगदान कोणीही पुसू शकत नाही, अशा शब्दात पवारांनी पंतप्रधान मोदींना लक्ष्य केल आहे.
या सभेत बोलताना शरद पवार यांनी खासदार आणि भाजपच्या उमेदवार नवनीत राणा यांचे नाव न घेता टीका केली.