(अजित जगताप)
(Satara News) वडूज (सातारा) : भारतीय जनता पक्ष सध्या महागाई, बेरोजगारी, खाजगीकरण पुरस्कृत केंद्र सरकार बनलेले आहे. यांच्या चौकशीबाबत संसदेत आवाज उठवणारे राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे नेते राहुल गांधी यांचे लोकसभेतील सदस्य रद्द करण्याची भूमिका घेतली आहे. त्याचा निषेध करण्यासाठी खटाव तालुका राष्ट्रीय काँग्रेसच्या वतीने मोर्चा काढून तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले. यावेळी घोषणाबाजी करून परिसर दणाणून सोडला.
राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या भूमिकेबाबत सर्वसामान्य माणसांना आदर…!
राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या भूमिकेबाबत सर्वसामान्य माणसांना आदर आहे. लोकशाही प्रणाली मध्ये सत्ताधारी व विरोधक ही दोन रथाची चाकी असून त्यातून लोकशाहीचा रथ पुढे जात असतो. परंतु, सध्या एकाधिकारी शाही व हुकूमशाही देशात आणण्यासाठी लोकशाहीचा गळा घोटला जात आहे.
त्याचा सर्व विरोधी पक्षाने समाचार घेतला असून खटाव तालुक्यातील तालुक्याचे ठिकाण असलेल्या वडूज नगरीतून भर उन्हात राष्ट्रीय काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज चौक- बस स्थानक ते खटाव तहसील कार्यालय अशी घोषणाबाजी देत रॅली काढली. त्यानंतर नायब तहसीलदार सचिन कर्णे यांना निवेदन देण्यात आले.
यावेळी बोलताना डॉ. महेश गुरव म्हणाले ,भाजप हा पक्ष आता हिंदुत्ववादी राहिलेल्या नसून लोकशाहीवादी तिलांजली देण्यासाठी हुकूमशाह पद्धतीने सर्व यंत्रणा कामाला लावत आहे. राहुल गांधींसारख्या अभ्यासू नेत्याच्या वक्तव्याबाबत खुलासा करण्याऐवजी उद्योगपती आदानीची चौकशी करण्याची मागणी केल्यामुळे पंतप्रधान मोदी अडचणीत येऊ शकतात. म्हणून संसदेतूनच राहुल गांधी यांना बाहेर काढण्याचा कुटिल डाव खेळला गेला आहे. याचा जाब नक्कीच मतदार विचारतील.
विजयकुमार शिंदे म्हणाले, सध्या देश एक वेगळ्या वाटचालीतून जात आहे. याला फक्त भाजप जबाबदार असून महागाई, बेरोजगारी ,गुंडगिरी ,खाजगीकरण व शेतकऱ्यांबद्दलचे चुकीचे धोरण राबवण्यात येत असल्यामुळे देशातील अखंडता व सर्वधर्मसमभाव अडचणीत आलेला आहे. चोराला चोर म्हटलं तर वाईट वाटण्यासारखं कारण नाही .आता चोराला चोर बोलण्याची चोरी झाल्याचेच उघड झाली आहे. असे स्पष्ट केले.
यावेळी राष्ट्वादी, राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी ही आपले मनोगत व्यक्त केले. या निषेध मोर्चामध्ये महाविकास आघाडीच्या घटक पक्षांमध्ये शिवसेना वगळता सर्व कार्यकर्त्यांनी सहभाग नोंदवला.
विशेष म्हणजे राष्ट्रीय काँग्रेसचे प्रांतिक सदस्य रणजीतसिंह देशमुख, काँग्रेस कमिटीचे खटाव तालुका अध्यक्ष डॉ. संतोष गोडसे, परेश जाधव, संदिप सजगणे, अशोकराव गोडसे ,राजू भैय्या मुलाणी, डॉ. विवेक देशमुख, अमरजीत कांबळे, सत्यवान कांबळे, परेश जाधव, इम्रान बागवान, बाबासाहेब माने, खटाव तालुका महिला अध्यक्ष सुजाता महाजन, शारदाताई भस्मे, अभय कुमार देशमुख, गणेश गोडसे, अक्षय थोरवे, सुनील गोडसे, प्रताप काटकर ,आनंदा साठे, सलमा डांगे, गफार पठाण, दिलीप जाधव, शिखरे बुवा, राहुल सजगणे, संदीप गोडसे, पृथ्वीराज गोडसे श्रीकांत काळे, युवा नेते इमू बागवान, तानाजीराव वायदंडे , राजेंद्र माने व कार्यकर्ते सहभागी झाले होते.
या मोर्चासाठी वडूज मध्ये चांगला पोलीस बंदोबस्त ठेवला होता. सामाजिक कार्यकर्ते विजय कुमार शिंदे यांच्या घोषणाबाजीने परिसर दणाणून गेला होता. संसदेत जाब विचारणार राहुल गांधी,, पण आदानीसाठी धावले मोदी मैदानी,,,, भाजपचे चिन्ह ”,,,, सत्तेत आली सर्वत्र ‘ मरगळ’ भाजपचा चेहरा मनुवादी,,, काँग्रेसच करणार चिंतामुक्त बी सी, ओ बी सी,,,, कोशियार के सन्मान मे, बीजेपी थी मैदान मे ,,,अशा पद्धतीने ही घोषणाबाजी करण्यात आली.
या मोर्चासाठी खटाव तालुक्यातील वडूज, शिरसवडी, मायणी, पुसेगाव, बुध, डिस्कळ, मोळ, विसापूर, निढळ, मोळ, कुरोली, गुरसाळे, निमसोड, पुसेसावळी, चितळी, अभेरी , औंध, वर्धनगड, ललगुन, आदी गावातील राष्ट्रीय काँग्रेसचे कार्यकर्ते बहुसंख्येने एकत्र आले होते.
अत्यंत शांततापूर्ण व लोकशाहीला साजेस अशा पद्धतीने राष्ट्रीय काँग्रेस कार्यकर्त्यांनी निषेध व्यक्त केला त्याबद्दल सर्व कार्यकर्त्यांचे राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या वतीने आभार मानण्यात आले विशेष म्हणजे संविधानाच्या पद्धतीने लोकशाही राहिलेली नाही. याची आठवण म्हणून खटाव चे तहसीलदार यांना संविधानाची प्रत द्यायची होती. ती राहून गेली या निषेध आंदोलनाला उदंड प्रतिसाद लाभल्यामुळे खटाव तालुक्यात पुन्हा एकदा राष्ट्रीय काँग्रेस गतवैभव प्राप्त करेल असा विश्वास व्यक्त करण्यात आला.