अजित जगताप
Satara News | वडूज : राजकीय दृष्ट्या भारतीय जनता पक्षाचे दोन बलाढ्य नेते खटाव तालुक्यात आहेत. सातारा भाजप जिल्हाध्यक्ष आमदार जयकुमार गोरे व माजी आमदार डॉ. दिलीप येळगावकर हे दोन्ही नेते भाजप पक्षाचे पिलर आहेत. राजकारणातील बदलामुळे त्यांच्यामध्ये संघर्ष पाहण्यास मिळाला. परंतु, आता दोन्ही नेत्यांचे एकत्रीकरण झालेले आहे. वडूजात एका कार्यक्रमाच्या वेळेला डॉ. येळगावकर यांनी गोरे यांच्यासाठी दगड उचलला.
वडूज ता. खटाव येथील उद्घाघाटन कार्यक्रमाच्या निमित्ताने भाजपचे दोन्ही नेते एकत्र आले होते.
श्रीफळ वाढवताना हातात दगड घेऊन डॉ. येळगावकर यांनी मनाचा मोठेपणा दाखवून गोरे यांच्या समोर श्रीफळ वाढवण्यासाठी दिला. आज श्री बसवेश्वर जयंती, रमजान ईद व अक्षय तृतीय या तिन्ही सणाच्या दिवशी झालेल्या या कार्यक्रमाला आजी माजी आमदारांनी हजेरी लावली.
यावेळी नगराध्यक्ष मनीषा काळे, वडूजचे माजी सरपंच व नगरसेवक अनिल माळी, ज्येष्ठ नेते दादासाहेब गोडसे, विश्वास गोडसे, काका बनसोडे, विक्रम रोमण, धनाजी चव्हाण, परेश जाधव, विठ्ठल बलशेठवार, विकास गोसावी, जयकुमार शिंदे तसेच वडूज नगरीचे मान्यवर मंडळी उपस्थित होते.
शुभकार्यासाठी श्रीफळ वाढवणे ही भारतीय संस्कृती असून या उद्घाघाटनाला श्रीफळ वाढवण्यासाठी गोरे हे वाकण्यापूर्वीच डॉ. दिलीप येळ गावकर यांनी मनाचा मोठेपणा दाखवून श्रीफळ व हातात दगड घेतला. त्यामुळे एकच चर्चा रंगली. यावेळी उपस्थितांनी टाळ्या वाजवून स्वागत केले.