दिनेश सोनवणे
दौंड : मिरवडी (ता दौंड) गावचे सरपंच सागर शेलार यांना सन २०२२ चा राष्ट्रसंत गाडगे महाराज राष्ट्रीय पुरस्काराने नुकतेच सन्मानित करण्यात आले आहे.
दिल्ली येथील महाराष्ट्र सदन येथे या कार्यक्रमाचे आयोजन सोमवारी (ता १०) रोजी करण्यात आले होते. यावेळी भारत सरकार राज्यमंत्री रिंचेन ल्हामो , मंत्री लक्ष्मणराव ढोबळे , यांच्याहस्ते सागर शेलार यांना पुरस्कार देऊन सन्मानित केले. यावेळी कमिशनर नार्कोटेस्ट राजेश डाबरे (IRS), नागपूर येथील राष्ट्रसंत तुकडोजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.एस. एन.पठाण, डेहराडून मेडिकल कॉलेजचे अधिस्टाता डॉ. दीपक देशपांडे आदी मान्यवर उपस्थित होते.
सरपंच सागर शेलार म्हणाले, मिरवडीगावात विविध नाविन्यपूर्ण सामाजिक उपक्रम राबिवणे. या मध्ये स्वच्छता, अभियान, आरोग्य , पर्यावरण , निसर्गातील पक्षी यांच्या करिता ज्युस बार (अन्न, पाण्याची सोय) शैक्षणिक , आरोग्य विषयक शिबिरे , संस्थान ला भेटी, शासकीय योजनांचे लाभार्थी यांना प्रत्यक्ष वाटप, महिला सक्षमीकरण, असे सामाजिक कार्यक्रम गावात राबविण्यात आले. त्याच बरोबर मिरवडी गावातील दैनंदिन होत असणारे ग्रामस्वच्छता अभियान , गावात एकूण ६००० देशी फळ झाडांची लागवड केली आहे.
दरम्यान, या वर्षीचा आर आर आबा स्मार्ट ग्राम पुरस्कार मिरवडी ला मिळाला या पुरस्काराची एकूण रक्कम १० लाख रु बक्षीस मिळाले, त्याच बरोबर संत गाडगे महाराज ग्रामस्वच्छता अभियान या मध्ये दौंड तालुक्यातुन प्रथम क्रमांक , राष्ट्रीय सरपंच कार्यशाळा मध्ये मिरवडी च्या सरपंच यांची निवड , आदर्श सरपंच पुरस्कार, या मुळे मला पुरस्कार मिळाला असून माझ्या या यशात गावातील नागरिक, मित्र परिवार यांचा मोलाचा वाटा आहे .अशी भावना सरपंच सागर शेलार यांनी व्यक्त केली.