(Sanjay Shirsat )पुणे : शिवसेनेचे नेते आणि आमदार संजय शिरसाट यांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांच्यावर खालच्या भाषेत टीका केली होती. त्यामुळे अंधारे या शिरसाट यांच्यावर चांगल्याच संतापल्या आहेत. हे प्रकरण शांत होणार नाही असे दिसून येत आहे. अंधारे यांनी या प्रकरणी महिला आयोगात धाव घेत शिरसाट यांच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार आता वादग्रस्त प्रकरणाचा तपास आता महिला पोलीस अधिकाऱ्याकडे सोपवण्यात आला आहे.
महिला पोलिस आता नेमकी काय करणार याकडे लक्ष लागून राहिले असून शिरसाट यांच्या अडचणीत चांगली वाढ होणार असल्याचे बोलले जात आहे. तसेच अंधारे या आज पुण्यातील शिवाजीनगर कोर्टामध्ये सुषमा अंधारे या संजय सिरसाट यांच्या विरोधात अब्रुनुकसानीचा दावा देखील दाखल करणार आहेत. छत्रपती संभाजीनगरमधील मेळाव्यात अंधारे यांच्याबाबत शिरसाट यांनी वादग्रस्त वक्तव्य केले होते.
दरम्यान, संजय सिरसाट यांनी देखील पत्रकार परिषद घेत आपल्यावरील आरोप फेटाळले होते. सुषमा अंधारेंबद्दल एकही शब्द ‘अश्लील’ बोलल्याचा दाखवा, मी तात्काळ राजीनामा देतो, असे शिरसाट यांनी सांगितले होते. माझ्यासाठी सत्ता महत्वाची नाही. मी चुकीचे काहीही बोललो असल्याचं सिद्ध केल्यास मी लगेच माझ्या आमदारकीचा राजीनामा देण्यासाठी तयार असल्याचे शिरसाट म्हणाले.
शिरसाट केली होती खालच्या भाषेत टीका…!
ती बाई सर्वांना म्हणते माझे भाऊ आहेत. काय काय लफडे केले तिने काय माहीत, असे धक्कादायक वक्तव्य शिरसाट यांनी केले होते. अंबादास दानवे यांनी मला फोन केला होता. म्हणाले, ती बाई डोक्याच्यावर झाली आहे, असा गौप्यस्फोटही शिरसाट यांनी केला. कोणीही आजकाल सोशल मीडियावर कॉमेट करतं. आम्हाला गद्दार… गद्दार म्हणतंय… अरे घरात बघ काय चाललंय. मग आमच्यावर टीका कर, असेही ते बोलले होते.