(Sanjay Shirsat) पुणे : शिवसेनेचे (शिदे गट) आमदार संजय शिरसाट यांची ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांच्या टीका करताना जीभ घसरली होती. त्यांनी केलेल्या बेताल वक्तव्यावर अंधारे यांच्या प्रतिक्रियेकडे लक्ष लागून राहिले होते. अखेर अंधारे या चांगल्याच संतापल्या आहेत. त्यांनी शिरसाटांचा चांगलाच समाचार घेतला आहे. तसेच याबाबत सुषमा अंधारे यांनी महिला आयोगाला पत्र लिहिले होते. याची दखल घेत आयोगाने पोलिसांकडून शिरसाट यांचे व्हिडिओ मागवले आहेत.
महिला आयोगाकडून दखल घेतल्याने शिरसाट यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. त्यांनी केलेल्या बेताल वक्तव्यामुळे राजकारण चांगलेच पेटले आहे. शिंदे गटात्या नेत्यांकडून सातत्याने महिलांवर खालच्या भाषेत बोलले जाते, त्यामुळे राष्ट्रवादीच्या रुपाली पाटील यांनी देखील संताप व्यक्त केला आहे.
व्हिडिओची तपासणी करुन महिला आयोग नेमकी या भुमिका घेणार याकडे आता सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
शिरसाट केली होती खालच्या भाषेत टीका…!
ती बाई सर्वांना म्हणते माझे भाऊ आहेत. काय काय लफडे केले तिने काय माहीत, असे धक्कादायक वक्तव्य शिरसाट यांनी केले होते. अंबादास दानवे यांनी मला फोन केला होता. म्हणाले, ती बाई डोक्याच्यावर झाली आहे, असा गौप्यस्फोटही शिरसाट यांनी केला. कोणीही आजकाल सोशल मीडियावर कॉमेट करतं. आम्हाला गद्दार… गद्दार म्हणतंय… अरे घरात बघ काय चाललंय. मग आमच्यावर टीका कर, असेही ते बोलले होते.