(Sanjay Raut) मुंबई : उध्दव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे नेते संजय राऊत (Sanjay Raut) प्रसार माध्यमांशी संवाद साधत असतात. त्यावेळी ते जे विधान करतात. त्यामुळे राजकीय वर्तुळात चांगली चर्चा रंगत असते. अशातच आता त्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते राज ठाकरे यांच्या बद्दल एक मोठे विधान केले आहे. राज ठाकरे देखील मुख्यमंत्री होऊ शकतात, असे त्यांनी विधान केले आहे.
आज पाडव्याच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील शिवसेनाभवनापुढे ‘भावी मुख्यमंत्री राज ठाकरे’ असे पोस्टर्स महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून झळकावण्यात आले. या पोस्टरवर जनतेच्या मनातील भावी मुख्यमंत्री म्हणून राज ठाकरे यांचा उल्लेख करण्यात आला आहे. या पोस्टरची चर्चा चांगलीच रंगली होती. त्यामुळे या पोर्टरवर काय प्रतिक्रिया येणार याकडे लक्ष लागून राहिले होते. आता ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी याबाबत प्रतिक्रिया दिली आहे.
संजय राऊत म्हणाले…!
”देशात लोकशाही आहे. कोणी ही मुख्यमंत्री होऊ शकतो. आमचा लोकशाहीवर विश्वास आहे. त्यांच्याकडे बहुमत असेल तर होऊ शकतात. बहुमत हे चंचल असतं. आज आमच्याकडे असेल उद्या दुसऱ्या कोणाकडे असेल.”
दरम्यान यावेळी बोलताना राऊत यांनी केंद्र सरकारला देखील जोरदार टोला लगावला आहे. महाराष्ट्राची गुढी म्हणून शिवसेनेचा उल्लेख केला जातो. त्या गुढीवर केंद्र सरकारने मोगलाई पद्धतीने आक्रमक केले आहे. त्यामुळे राज्यातील जनता दुःखी आहे. पण जनतेचा संकल्प आहे, नव्या वर्षात ही गुढी घराघरात उभारल्या शिवाय राहणार नाही असेही राऊत यांनी म्हटले आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा…!
Politics News त्या; विधानामुळे आमदार बच्चू कडू यांना अटक होणार ??
Great News : महाराष्ट्राच्या तीन छायाचित्रकारांना राष्ट्रीय छायाचित्रण पुरस्काराने गौरविले!