मुंबई : शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना मुंबई सत्र न्यायालयाने पुन्हा सात दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. पुढील सुनावणी 17 ऑक्टोबरला होणार आहे. यामुळे संजय राउत यांना यदाही दिलासा मिळालेला नाही. संजय राऊत यांच्या जामीन अर्जावर आज ( ता. १०) सत्र न्यायालयात सुनावणी पार पडली.
दरम्यान, पत्राचाळ पुनर्विकास प्रकल्पात संजय राऊत यांनी आर्थिक घोटाळा केला असल्याचा ठपका ठेवत 31 जुलै रोजी ईडीने त्यांना अटक केली आहे. पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी ईडीने काही दिवसांपूर्वी संजय राऊत यांच्याविरोधात पुरवणी आरोपपत्र दाखल केले होते. तसेच 1039 कोटी रुपयांच्या या गैरव्यवहारात राऊत यांचा थेट सहभाग असल्याचा दावा ईडीकडून करण्यात आला आहे.