Sanjay Raut मुंबई : राज्याच्या राजकारणात आज सर्वात मोठी बातमी घडली आहे. ती म्हणजे दिग्गज नेते व राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्षपद सोडण्याची घोषणा केली. यापुढं कुठलीही निवडणूक लढणार नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे.
पवार यांच्या जीवनावरील ‘लोक माझे सांगाती’ या आत्मचरित्रपर पुस्तकाचं प्रकाशन आज मुंबईत करण्यात आलं. त्यावेळी ते बोलत होते. पवार यांच्या घोषणेनंतर देशभरातून राजकीय नेत्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut )यांची प्रत्रिक्रिया समोर आली आहे.
गलिच्छ राजकारण आणि आरोप-प्रत्यारोपांना कंटाळून शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनीही शिवसेनाप्रमुखपदाचा राजीनामा दिला होता. इतिहासाची पुनरावृत्ती होताना दिसत आहे. पण शिवसैनिकांच्या प्रेमापोटी त्यांना आपला निर्णय मागे घ्यावा लागला… बाळासाहेबांप्रमाणेच पवारसाहेबही राज्याच्या राजकारणाचा आत्मा आहेत.असे ट्वीट राऊत यांनी केले आहेत.
संजय राऊत म्हणाले…!
एक वेळ अशी आली..घाणेरडे आरोप..प्रत्यारोप..राजकारण याचा उबग येऊन शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी देखील शिवसेना प्रमुख पदाचा राजीनामा दिला होता.शरद पवार यांनी तेच केले आहे. जनतेच्या रेट्या मुळे बाळासाहेबांना राजीनामा मागे घ्यावा लागला.शरद पवार हे देशाच्या राजकारणाचे आणि समाजकारणाचे श्वास आहेत.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा….!
Politics | अजित पवारांना माझ्या शुभेच्छा आहेत, पण “काहीजण लायकी नसताना.. संजय राऊत म्हणाले