संभाजीनगर (औरंगाबाद) : राज्यपाल भगतसिंहा कोश्यारी यांनी केलेल्या वादग्रस्त विधानाचे आता पडसाद पडताना दिसून येत आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या पदवीदान समारंभात राज्यपाल बोलत असताना त्यांनी छत्रपती शिवराय हे जुन्या काळातील आदर्श असल्याचं म्हणत शिवाजी महाराज तो पुराने जमाने के आदर्श है, अभी तुम्हारे सामने नितीन गडकरी जैसे आदर्श है असे वक्तव्य केले होते.
यावर आता छत्रपती संभाजीराजे यांनी देखील आक्रमक प्रतिक्रिया दिली आहे. राज्यपाल सातत्याने अशी बडबड का करतात असा मला प्रश्न पडला असून राज्यपालांना महाराष्ट्राच्या बाहेर काढा, अशी प्रतिक्रिया छत्रपती संभाजीराजे यांनी दिली आहे.
यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यपाल कोश्यारी यांना महाराष्ट्रात ठेवू नये. महाराष्ट्राचं वैभव असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज आणि महापुरुषांबद्दल असले घाणेरडे विचार घेऊन कुणी राज्यात येऊच कसं शकतं. यांना अजून राज्यपाल पदी ठेवता तरी कसं? असा संतप्त सवालही संभाजीराजे छत्रपती यांनी विचारला.