राजेंद्र गुंड
Saline land : माढा, (सोलापूर) : माढा तालुक्यातील उंदरगाव (ता. माढा) येथे आमदार बबनराव शिंदे व जिल्हा दूध संघाचे चेअरमन रणजितसिंह शिंदे यांच्या हस्ते क्षारपड जमीन सुधारणा प्रकल्पाचा शुभारंभ होणार असल्याची माहिती विठ्ठलराव शिंदे साखर कारखान्याचे ऊसपुरवठा अधिकारी नारायण लगड यांनी दिली. बुधवारी (ता. २१) सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. (Saline land)
पिंपळनेर येथील विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखाना व उंदरगाव येथील गंगामाई क्षारपड जमीन संवर्धन संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. (Saline land)
सीना नदी काठावरील अनेक शेतकऱ्यांनी पाण्याचा शेतीसाठी अविवेकी व अतिरेकी वापर केल्यामुळे अनेकांच्या जमिनी क्षारपड व नापीक बनल्या आहेत. यावर कायमस्वरूपी ठोस उपाययोजना करण्याच्या दृष्टीने व शेतकऱ्यांना योग्य पद्धतीने आणि काटकसरीने पाणी वापराचे नियोजन माहीत व्हावे. या उद्देशाने विठ्ठलराव शिंदे सहकारी कारखान्याच्या माध्यमातून हा विधायक उपक्रम हाती घेतला आहे. (Saline land)
यावेळी प्रशासक कुंदन भोळे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती सुहास पाटील, माढेश्वरी बँकेचे उपाध्यक्ष अशोक लुणावत, विठ्ठलराव शिंदे कारखान्याचे संचालक निळकंठ पाटील, अमोल चव्हाण, संदीप पाटील, प्राचार्य सुभाष नागटिळक, मार्केट कमिटीचे संचालक हनुमंत पाडूळे, स्थापत्य अभियंता कीर्तीवर्धन मरजे, तालुका कृषी अधिकारी भारत कदम, केन मॅनेजर संभाजी थिटे, कृषी पर्यवेक्षक अनिल देशमुख, सरपंच संदीप पाटील, माजी सरपंच बाबा चव्हाण यांच्यासह मानेगाव परिसरातील विविध गावचे सरपंच, उपसरपंच, सोसायटीचे चेअरमन व शेतकरी उपस्थित राहणार असल्याचे संयोजकांनी सांगितले आहे. (Saline land)