दिनेश सोनवणे
दौंड : मिरवडी (ता. दौंड) गावचे सरपंच सागर रगुनाथ शेलार यांना जनकल्याण सामाजिक सेवा संस्था कोल्हापूर या संस्थेतर्फे आदर्श सरपंच पुरस्काराने गौरविण्यात आले.
कोल्हापूर येथे पुरस्कार प्रदान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. जनकल्याण सामाजिक सेवा संस्था (दिंडनेर्ली ता करवीर जि कोल्हापूर) श्री संत सावता माळी पर्यावरण संमेलन राज्यस्तरीय आदर्श सरपंच पुरस्कार हा नाविन्यपूर्ण योजना, विशेष उपक्रम, आरोग्य, पर्यावरण आदी क्षेत्रात काम केल्याने शेलार यांना राज्यस्तरीय आदर्श सरपंच पुरस्कार देण्यात आला.
या बाबत गावचे सरपंच सागर शेलार म्हणाले, मिरवडी ग्रामपंचायत कडून गावातील मुख्य रस्ते, शाळा, सभा मंडप, चौक, समाज मंदिर,धार्मिक स्थळे, स्मशानभूमी या भागात वृक्षारोपण केली आहे. तसेच गावातील मुख्य नियोजन बद्द रस्ते आहे. जिल्हा परिषद शाळेतील संख्या लक्षणीय असून येथील शिक्षकांना आदर्श शिक्षक म्हणून पुरस्कार मिळाला आहे.
गावात निसर्गातील पक्षांन करिता,अन्न व पाण्याची सोय (पक्षी ज्युस बार) ही संकल्पना राबली असून या मुळे गावात विविध पक्षांचा सहवास वाढला आहे. जिल्हा परिषद, आणि पंचायत समिती यांच्या मार्फत राबविण्यात येणाऱ्या सर्व योजना गावात (मूलभूत सुविधा) देण्यात ग्रामपंचायत कडून सर्वस्वी प्रयत्न केले गेले आहे.
गावात विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात आले आहे. कोरोनाच्या काळात गावातली सर्व नागरिकांचे लसीकरण झाले आहे.सकारात्मक आशावाद सरपंच सागर शेलार यांनी व्यक्त केला. येणारा काळ हा तंत्रज्ञान चा असल्याने तसेच मिरवडी गावापासून पुणे, हडपसर ही महानगर जवळ असल्याने मिरवडी गावातील युवकांना करिता, आयटी सेक्टर, व्यवसाय मार्गदर्शन, व स्पर्धा परीक्षा बाबत विविध मार्गदर्शन ( सेमिनार) चे आयोजन ही केले होते. या कामांची दखल घेण्यात आली आहे. माझ्या यशात माझे सहकारी, मित्र गावातील नागरिक ग्रामपंचायत सदस्य, यांचे मोलाचे सहकार्य असल्याचे सरपंच शेलार म्हणाले.