( ED News ) मुंबई : शिवसेनेचे नेते रामदास कदम यांचे लहान भाऊ उद्योजक सदानंद कदम यांना ईडीने ताब्यात घेतले आहे. दापोलीमधील कथीत साई रिसॉर्टप्रकरणी ईडीने कारवाई केल्याची माहिती मिळत आहे. खेडमधील कुडोशी येथील त्यांच्या अनिकेत फार्म हाऊस या निवासस्थानातून सदानंद कदम यांना ईडीच्या अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतले आहे. सदानंद कदम यांना घेऊन ईडीचे पथक मुंबईकडे रवाना झाले आहे.
साई रिसॉर्टप्रकरणी ईडीने केली कारवाई…
दापोली, मुरुड येथील साई रिसॉर्टची मालकी सध्या सदानंद कदम यांच्याकडे आहे. सदानंद कदम हे शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि माजी मंत्री रामदास कदम यांचे सख्खे लहान बंधू आहेत. गेल्या काही दिवसांपासून भाजप नेते किरीट सोमय्या यांनी दापोलीतील साई रिसॉर्ट प्रकरणी उद्धव ठाकरे गटाचे आमदार अनिल परब यांच्यावर सातत्याने आरोप केले होते.
दरम्यान, साई रिसॉर्ट घोटाळा प्रकरणी ईडीने आज सदानंद कदमांना अटक केल्यानंतर किरीट सोमय्या यांनी अब तेरा क्या होगा अनिल परब, असा सवाल विचारला आहे. त्यामुळे आता अनिल परब यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा..
Hadapsar News : गावाचा विकास होण्यासाठी युवकांनी सक्रिय सहभाग घ्यावा ; अनिल रांजणे
Big Breaking News : खासदार संजय राऊत यांच्या दुसऱ्या घरीही ईडीचा छापा