Maharashtra Politics : राज्यात सद्या आगामी विधानसभा निवडणुकांची धामधूम सुरु आहे. प्रत्येक पक्ष जोरदार तयारीत दिसून येत आहे. नेते दावे-प्रतिदावे करत आहेत. अशातच सुप्रिया सुळे यांनीही सरकारवर तोफ डागली आहे. एक वर्षांपूर्वी पक्ष कुठे होता, चिन्हं कुठे होतं? आमदार, खासदार कुठे होते आणि आज आम्ही कुठे आहोत. या साऱ्यासाठी महाराष्ट्रातील जनतेचे मी मनःपूर्वक आभार मानते. ज्यांची सत्तेची पद होती त्यातील काही लोकांनी आमचा पक्ष आणि चिन्ह घेऊन आमचे आयुष्य उध्वस्त केलं. मुलीचा वाढदिवस मी कोर्टात साजरा केला. मात्र, सत्य परेशान हो सकता है, मगर पराजित नहीं. असं म्हणत त्यांनी सरकारवर टीका केली.
त्या पुढे म्हणाल्या, मायबाप महाराष्ट्राच्या जनतेने जी साथ दिली, त्या मायबाप जनतेच्या लक्षात आलं की आदरणीय पवार साहेब आणि उद्धव ठाकरे यांच्यावर अन्याय झाला आहे. अदृश्य शक्तीला असं वाटतं की अदृश्य शक्ती दिल्लीवरून काहीही करू शकते. मात्र, या राज्याने दाखवून दिलं की अदृश्य शक्ती इथे काहीही करू शकत नाही. हा देश फक्त आणि फक्त भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाने चालतो. असे म्हणत सुप्रिया सुळे यांनी सरकारला धारेवर धरले.
लोकशाहीमध्ये सगळयांना बोलयाचा अधिकार..
राज्याच्या अर्थ खात्यावर बोलताना खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या, अर्थ खात्याच्याबाबत डेटा फार महत्वाचा आहे. जो महारष्ट्र सरकारकडून येतो. तुम्ही किती लोन घेऊ शकतात, केंद्र किंवा राज्याला काही लिमिट आहे. अटलबिहारी वाजपेयी यांच्या काळात ही मर्यादा घातली होती. एफआरबीएम कायद्याबद्दल सर्वांचे एक मत आहे. जास्त लोन घेणं, हा कायदा फॉलो केला जातं नाही. यावर जयंत पाटील यांनी डेटा वाईज भाष्य केलं होते. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, राज ठाकरे ही तेच म्हणतं आहे. त्यामुळे यात अभ्यासाची आणि तसेच डेटा सांगतोय त्यानुसार चौकशी गरजेची आहे. निर्णय पुढे रेटला गेला आहे. लोकशाहीमध्ये सगळयांना बोलयाचा अधिकार आहे. मात्र ऑब्जेक्शन असताना त्याकडे दुर्लक्ष करत असल्याचेही सुप्रिया सुळे यावेळी म्हणाल्या
आम्ही अदृश्य शक्तीवाले नाही : सुप्रिया सुळे
अतिथी देवो भव: ही आपली संस्कृति आहे. त्यामुळे पाहुण्यांचे स्वागत झालंच पाहिजे. आम्ही अदृश्य शक्तीवाले नाही. आम्ही संविधानवाले आहोत. संविधान केंद्रबिंदु ठेवून आम्ही राजकारण करतो. सशक्त लोकशाहीमध्ये दिलदार विरोधक असला पाहिजे. शरद पवार यांना रोखा, उद्धवजींना रोखा आणि वेळ पडली तर पक्ष फोडा, कार्यकर्ते फोडा आणि सत्तेमध्ये या, अस त्यांनी म्हटले आहे. भाजप जुना पक्ष आहे. तरीही आजही त्यांच्या पक्षात टॅलेंट दिसत नाही. अशी टीकाही सुळे यांनी केली आहे.