Rohit Pawar अहमदनगर : राष्ट्रवादी काँग्रेसचे कर्जत-जामखेड मतदारसंघाचे आमदार रोहित पवार यांची तरुणाईची चांगलीच क्रेझ आहे. ते तरुणाईशी नेहमीच संवाद साधत असतात. त्यामुळे तरुणाईचा आमदार म्हणून देखील त्यांची चांगलीच ओळख आहे. असे असताना एका तरुणीने रोहित पवारांना एक वेगळाच प्रश्न विचारल्याने चांगलीच चर्चा रंगली आहे.
“आस्क मी एनिथिंक” या कार्यक्रमात एका तरुणीने रोहित पवार यांना एक प्रश्न विचारला. त्यावेळी आता आमदार रोहित काय उत्तर देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. त्यांनी बरोबर बॅलन्स उत्तर देत कोंडीतून सुटका करुन घेतली. कल्याणी मोरे या नावाच्या ट्विटर हॅण्डलवरून रोहित पवारांना प्रश्न विचारण्यात आला आहे.
”दादा माझे एका मुलावर खूप प्रेम आहे. आम्ही दोघे लग्न पण करणार आहोत, पण मुलाच्या घरचे आमच्या लग्नाला तयार होत नाहीत. म्हणून आम्ही दोघांनी पळून जायचा निर्णय घेतला आहे. तुमच्या मते मी काय करू..?” असा प्रश्न विचारण्यात आला.
या प्रश्नाला उत्तर देताना रोहित पवार म्हणाले…!
, ”पळून जाण्यासाठी आई-वडीलांनी सहमती दिली असेल तर ते म्हणतात तसं नक्की करा ! रोहित पवार यांचं हे उत्तर सध्या चांगलंच चर्चेत आहे.
त्याचबरोबर एका नेटकऱ्याने रोहित पवारांना विचारलं, “जर तुमचा बायोपिक करायचं ठरलं, तर तुमच्या व्यक्तीरेखेसाठी तुमची निवड कोण असेल? वैभव तत्ववादी की ललित प्रभाकर? यावर उत्तर देताना रोहित पवार यांनी , “माझा रोल मलाच करायला आवडेल.” असे उत्तर दिले.
तर आजोबा शरद पवार यांच्याकडून कोण-कोणत्या गोष्टी शिकलात, ज्याचा तुम्हाला खूप फायदा झाला? असा प्रश्न एका युजर्सने विचारला. त्यावर उत्तर देताना रोहित पवार म्हणाले, गरम वातावरणात डोकं शांत ठेवणे या गोष्टी शिकल्याचे त्यांनी सांगितले आहे.