राहुलकुमार अवचट
दौंड – पुणे जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गणांची सोडत आज गुरुवा ( ता. २८) जाहीर झाली आहे. यामध्ये दौंड तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या ८ गटांचे जिल्हा परिषद येथे तर दौंड पंचायत समिती गणांची तहसील कार्यालय येथे जाहीर करण्यात आले आहे.
दौंड तालुक्यातील गट व आरक्षण पुढील प्रमाणे..
१) राहु – खामगाव गट क्र.४८ – सर्वसाधारण
२) पारगाव- पिंपळगाव गट क्र.४९ – अनुसुचित महिला
३) गोपाळवाडी – कानगाव गट क्र.५० – सर्वसाधारण
४)लिंगाळी – देऊळगावराजे गट क्र.५१- सर्वसाधारण
५) खडकी – राजेगाव गट क्र ५२- अनुसुचित महिला
६) पाटस – कुरकुंभ गट क्र. ५३ – सर्वसाधारण पुरुष
७) वरवंड- बोरीपार्धी गट क्र ५४- सर्वसाधारण
८) यवत – बोरीभडक गट क्र. ५५-
नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग महिला
दौंड पंचायत समिती गण व आरक्षण
१) खामगाव गण क्र. ९५ – सर्वसाधारण
२) राहू गण क्र. ९६ – सर्वसाधारण
३) पिंपळगाव गण क्र. ९७ – सर्वसाधारण स्त्री
४) पारगाव गण क्र ९८ – अनुसुचित जाती स्त्री
५) कानगाव गण क्र .९९ – सर्वसाधारण स्त्री
६) गोपाळवाडी गण क्र.१०० – नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग स्त्री
७) लिंगाळी गण क्र.१०१ – सर्वसाधारण
८) देऊळगाव राजे गण क्र.१०२ – सर्वसाधारण
९) राजेगाव गण क्र. १०३ – नागरिकांचा मागास प्रवर्ग
१०)खडकी गण क्र.१०४ – नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग स्त्री
११)कुरकुंभ गण क्र.१०५ – सर्वसाधारण स्त्री
१२) पाटस गण क्र.१०६ – सर्वसाधारण
१३)वरवंड गण क्र.१०७ – सर्वसाधारण स्त्री
१४) बोरीपार्धी गण क्र.१०८- सर्वसाधारण स्त्री
१५) यवत गण क्र.१०९ – नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग
१६) बोरीभडक गण क्र.११० – अनुसूचित जाती
दरम्यान, गुरुवार ( ता. २८) रोजी आरक्षण सोडतीनंतर, दुसर्या दिवशी म्हणजेच शुक्रवारी (ता. २९) जुलैला नवीन आरक्षणाची प्रारूप अधिसूचना जाहीर केली जाणार आहे. दोन ऑगस्टपर्यंत आरक्षणावर हरकती व सूचना सादर करता येणार आहेत. प्राप्त झालेल्या हरकती व सूचनांवर जिल्हाधिकारी हे सुनावणी व निर्णय घेऊन ता. ५ ऑगस्ट रोजी नवे आरक्षण अंतिम केले जाणार आहे.