सुरेश घाडगे
परंडा : परंडा तालुक्यातील ६ जिल्हा परिषद गट व १२ पंचायत समिती गणांतील आरक्षण आज गुरुवारी (ता.२८) जाहीर झाले आहे.
परंडा पंचायत समितीच्या १२ गणांतील आरक्षण तहसिलदार रेणूकादास देवणीकर यांनी जाहिर केले आहे. यावेळी पोलीस निरिक्षक सुनिल गिड्डे उपस्थित होते. तसेच गट व गण बहुतांश ठिकाणी आरक्षीत झाल्याने मात्तबर राजकारण्यांना मोठा फटका बसला आहे.
परंडा तालुक्यातील ६ जिल्हा परिषद गटापैकी केवळ एकमेव शेळगाव गट सर्वसाधारण तर ५ गट ओबीसी ( नागरिकाचा मागास प्रवर्ग, यामध्ये ३ महिला) असे आरक्षण झाले आहे. तालुक्यातील जिल्हा परिषद गटामध्ये डोंजा, जवळा व आसू हे ३ ओबीसी महिला तर आनाळा व खासापुरी हे २ ओबीसी आरक्षीत झाले आहेत.
पंचायत समिती गणातील १२ गणातील ६ गण महिला राखीव झाले आहेत. यामध्ये ५ जागा सर्वसाधारण, ३ जागा सर्वसाधारण महिला, ३ जागा नागरिकाचा मागास प्रवर्ग ( यामध्ये २ महिला नागरिकांचा मागास प्रवर्ग ) तर १ जागा अनुसूचित जाती महिला आहे.
दरम्यान, परंडा पंचायत समिती गण- चिंचपुर बु – सर्वसाधारण, शेळगाव – सर्वसाधारण, आनाळा- अनुसूचित जाती महिला, कंडारी – नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला, डोंजा – सर्वसाधारण, सोनारी – नागरिकांचा मागास प्रवर्ग, भोत्रा- नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला, खासापुरी – सर्वसाधारण महिला, जवळा नि – सर्वसाधारण, सिरसाव – सर्वसाधारण, आसु- सर्वसाधारण महिला, शिराळा – सर्वसाधारण महिला असे आरक्षण झाले आहे. १२ गणातील ६ गण महिला राखीव झाले आहेत.