Renu Bhatia हरियाणा : महिलांचे वाढते प्रश्न, त्यांच्या सुरक्षिततेची काळजी, तसेच होणारे आत्याचार यावर सातत्याने बोलले जाते. त्यांनी नेमकी काय काळजी घ्यावी, हे देखील सातत्याने सांगितले जाते. अशाच एका कार्य़क्रमात महिला आयोगाच्या अध्यक्षांनी मार्गदर्शन करताना एक वक्तव्य केल्याने देशात खळबळ उडाली आहे. हरियाणा राज्याच्या महिला आयोगाच्या अध्यक्षा रेणू भाटिया Renu Bhatia यांनी महिलांच्या संदर्भात अजब वक्तव्य केले आहे.
मुली ओयो रुममध्ये हनुमानाची आरती करायला जात नाहीत..!
हरियाणा राज्यातील एका महाविद्यालयातील कार्यक्रमात बोलताना भाटिया म्हणाल्या ‘मुली ओयो रुममध्ये हनुमानाची आरती करायला जात नाहीत, अशा ठिकाणी जाताना तुमच्यासोबत वाईटही घडू शकते, याचे भान ठेवायला हवे, ‘ अशा प्रकारचं वक्तव्य भाटीया यांनी केले आहे.
आरकेएसडी महाविद्यालयात सायबर क्राईम आणि जनजागृती कार्यक्रमा दरम्यान, महिलांच्या छेडछाडीबाबत जनजागृती व्हावी, या विषयावर त्यांना कार्यक्रमात बोलायचे होते. यासाठी त्या कार्यक्रमात उपस्थित राहिल्या होत्या. त्यांच्या वक्तव्याने आता उलट सुलट प्रतिक्रिया उमटत असून संताप व्यक्त केला जात आहे.
सर्वोच्च न्यायालयाने आखून दिलेल्या मार्गदर्शक तत्त्वांमध्ये लिव्ह-इन रिलेशनशिप सारख्या कायद्यामुळे आमचे हात बांधले गेलेत. लिव्ह-इन रिलेशनशिप सारखा कायद्याचा पुनर्विचार करणे, त्यात बदल करणे, आवश्यक आहे, असे ही मत भाटीयांनी व्यक्त केले.
मुली ओयो रुममध्ये हनुमानजीची आरती करायला तर जात नाहीत. अशा वेळी या संबंधी तुमची स्वतःचीच जबाबदारी असते. लैंगिक शोषणाच्या ज्या काही प्रकरणं पुढे येतात. त्या बहुतांशी लिव्ह इनबाबत असतात. याबाबतीत हस्तक्षेप करून परिस्थितीला हाताळणे कठीण असते. लिव्ह-इन रिलेशनशिप कायद्यांमुळे आमचेही हात बांधले गेलेत. अशा कायद्यामुळेच गुन्ह्यांमध्ये घट होत नाही कुटुंबव्यवस्था नष्ट होत आहे, असेही भाटीया म्हणाल्या.