सुरेश घाडगे
परंडा : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सदस्य नोंदणीला परंडा व भूम तालुक्यात आज सोमवारी (ता. २९ ) सुरू करण्यात आली आहे. हि नोंदणी मनसे जिल्हाध्यक्ष आबासाहेब ढवळे यांच्या नेतृत्वाखाली होत आहे.
मनसे जिल्हाध्यक्ष आबासाहेब ढवळे म्हणाले कि, गावोगावी सदस्य नोंदणी कार्यक्रम राबविला जात असून गाव तिथ सदस्य नोंदणी व शाखा स्थापना करण्यात येत आहे. नागरिकांचा प्रतिसाद मिळत आहे. नुतन सदस्यांना पुष्पगुछ देऊन पक्षात स्वागत करण्यात येत आहे.
दरम्यान, मनसे जिल्हाध्यक्ष आबासाहेब ढवळे यांनी जीपवर मनसे पोष्टर , झेंडे, सदस्य नोंदणी बॅनर लावले आहेत . मनसे सदस्य नोंदणी जीप रथ सर्वांचे आकर्षण झाला आहे.
यावेळी परंडा विधानसभा अध्यक्ष जलाल शेख, तालुका अध्यक्ष सुरेश पाटील, उपाध्यक्ष बाळासाहेब कांबळे, शहर सचिव ठोसर, महादेव बानगुडे, अनुप मुळूक तालुका उपाध्यक्ष मेघनाथ खवले ,तालुका सचिव समाधान कदम आदी मनसे पदाधिकारी सदस्य नोंदणीसाठी परिश्रम घेत आहेत.