मुंबई : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्व पक्ष आपली मोट बांधत आहेत. सर्व तयारी सूर झाली आहे. आता अशातच दिल्लीत काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांची 25 जूनला बैठक होणार आहे. आगामी चार राज्यात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या बैठकांना सुरूवात झाली आहे.
लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला महाराष्ट्रात चांगलेच यश मिळाल्याचे दिसून आले आहे. परंतु आता विधानसभा निवडणुकीपूर्वी मुंबई काँग्रेसमधील वाद समोर आला आहे. मुंबई काँग्रेसमधील हा वाद आता थेट दिल्लीत पोहचला आहे. मुंबई काँग्रेसच्या १६ बड्या नेत्यांनी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांना पत्र लिहिले आहे. वर्षा गायकवाड यांच्या विरोधात हे सारे नेते सक्रीय झाले आहे. मुंबई काँग्रेस अध्यक्षपदावरुन वर्षा गायकवाड यांना हटवण्याची मागणी केली आहे. या नेत्यांनी वर्षा गायकवाड यांच्या कामकाजावर आपेक्ष नोंदवला आहे. तसेच पक्षात संघटनात्मक बदलाची सुद्धा मागणी केली आहे.
कोणी लिहिले पत्र
विधानसभा निवडणुका आणि मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील संघटनेत बदलाची मागणी केली गेलेली आहेत. त्यात काँग्रेस नेत्यांनी 16 जून रोजी पत्र लिहिले आहे. या नेत्यांमध्ये राज्यसभा सदस्य आणि काँग्रेस कार्यकारिणी सदस्य चंद्रकांत हंडोरे, माजी शहर पक्षप्रमुख जनार्दन चांदूरकर आणि भाई जगताप, ज्येष्ठ नेते नसीम खान, मधु चव्हाण, सुरेश शेट्टी, झाकीर अहमद, चरणसिंग सप्रा आणि महाराष्ट्र काँग्रेसचे कोषाध्यक्ष तसेच अमरजीत मन्हास यांचा समावेश आहे. राष्ट्रीय अध्यक्षांनी लवकरच मुंबई भेटीवर येण्याची मागणीही यावेळी या निवेदनात केली आहे.
मल्लिकार्जुन खर्गे यांच्या निर्णयाकडे लक्ष
मुंबई काँग्रेसमधील १६ बड्या नेत्यांनी राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांना पत्र लिहिले आहे. यात पक्षातील अनेक प्रमुख पदाधिकाऱ्यांचाही समावेश असल्याने याप्रकरणी मल्लिकार्जुन खर्गे काय निर्णय घेतात याकडे सर्वांचे आहे.
दिल्लीत काँग्रेस नेत्यांची बैठक
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांची आज (25 जून) बैठक होणार आहे. आगामी चार राज्यात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या बैठकांना सुरूवात झाली आहे. आज मंगळवारी महाराष्ट्रातील नेत्यांची केंद्रीय काँग्रेस नेत्यांसोबत बैठक होत आहे. या बैठकीला राहुल गांधी, मल्लिकार्जुन खर्गे उपस्थित राहणार आहेत.