मुंबई : ‘मुख्यमंत्री पदासाठी रश्मी ठाकरे यांनी उद्धव यांना आजारी पाडलं. रश्मी ठाकरे यांना नवऱ्याच्या मुख्यमंत्रीपदात काहीच रस नव्हता. त्यांना आपल्या मुलाला मंत्री झालेलं पाहायचं होतं. त्यामुळेच हा आघाडीचा घाट घातला गेला’, असा थेट आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते प्रकाश महाजन यांनी करत खळबळ उडवून दिली आहे.
उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस यांच्याशी हातमिळवणी करताना महाविकास आघाडीची स्थापना करताना सत्ता मिळविली होती. राज्यात आघाडी सरकार स्थापन करण्यात अन् मुख्यमंत्रीपदासाठी ठाकरेंना राजी करण्यात रश्मी ठाकरें यांनी पुढाकार घेतला होता, अशा चर्चा रंगल्या होत्या. पण आता मनसेने थेट रश्मी ठाकरे यांचे नाव घेत नव्या वादाला तोंड फोडले फोडले आहे. मुंबईतील एका कार्यक्रमात प्रकाश महाजन बोलत होते.
‘क्षणिक मुख्यमंत्रीपदासाठी पित्याने जपलेले राजकीय विचार उद्धव ठाकरेंनी सोडून दिले. बाप भलं मोठं भांडवलं सोडून गेला होता. दहा वर्षात त्या पक्षाचं पूर्ण वाटोळं करून आता बसलेत. शरद पवारांचा डाव होता अन् शिवसेनेचे दोन शकले झाले. उद्धव ठाकरे बापाचं भांडवल आणि बापचं नाव घेऊन आले.
त्यांना बाकीचा काही अनुभव नाही. एखादी शाखा चालवण्याचा अनुभव नाही. हे सरकार स्थापन झालं. या सरकारनं असं काय केलं?,” असा सवाल प्रकाश महाजन यांनी उपस्थित केला. प्रकाश महाजन यांच्या वक्तव्याने एकाच खळबळ उडाली आहे.