पुणे – अहमदनगर जिल्हा मित्र मंडळ पुणे संस्थेची नुकतीच कार्यकारीणी जाहीर करण्यात आली असून संस्थेच्या अध्यक्षपदी रावसाहेब पवार तर उपाध्यक्षपदी साहेबराव खामकर व वैशाली मोहिते यांची निवड करण्यात आली आहे. अहमदनगर जिल्हा मित्र मंडळ, पुणे या संस्थेची सन २०२२ -२३ ते सन २०२७- २०२८ या कालावधीसाठी नुकतीच नवीन कार्यकारी मंडळाची निवड जाहीर करण्यात आली आहे.
कार्यकारीणी मंडळाचे प्रमुख मार्गदर्शक राज्याचे माजी सहकार आयुक्त भास्करराव शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.
या मंडळाची पब्लिक ट्रस्ट म्हणून सन १९९३ मध्ये स्थापना झालेली असून विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह, पारितोषक, गुणगौरव तसेच सांस्कृतिक कार्यक्रम, सहकारी संस्था स्थापन करणे, वधूवर सूचक केंद्र आदि विविध उपक्रम मंडळातर्फे आयोजित केले जातात. संस्थेचे वतीने सहकारी ग्राहक भांडार, शेती माल प्रक्रिया ऊद्योग सुरू करण्याचा मानस आहे, असे निवडीनंतर बोलताना नवनिर्वाचित उपाध्यक्ष साहेबराव खामकर यांनी सांगितले.
संस्थेची कार्यकारीणी पुढीलप्रमाणे :
रावसाहेब पवार (अध्यक्ष), साहेबराव खामकर (उपाध्यक्ष), वैशाली मोहिते (उपाध्यक्ष), रावसाहेब सपकाळ (मानद सचिव), साहेबराव मोरे (कोषाध्यक्ष), सुरेश कोते, दत्ताराम रासकर, सुजाता जगताप, नंदा पंडित, रवि चौधरी, बाळासाहेब वाफारे, सतीष राजहंस, प्रा. सुनीलराजे निंबाळकर नंदकुमार शेळके (सर्व सदस्य)