लोणी काळभोर, (पुणे) : मांजरी (बु) (ता. हवेली) येथील रमेश ज्ञानोबा उंद्रे यांची राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीच्या पुणे जिल्हा उपाध्यक्षपदी (अजित पवार गट) नुकतीच निवड करण्यात आली आहे.
राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांनी नुकतेच निवडीचे पत्र रमेश उंद्रे यांना दिले आहे. उंद्रे यांनी याअगोदर हवेली तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष संघटनेत सरचिटणीस, उपाध्यक्ष म्हणून काम पाहीले आहे.
दरम्यान, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, सहकार मंत्री दिलीप वळसे-पाटील, जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांच्या नेतृत्वाखाली व मार्गदर्शनाखाली काम करणार असल्याचे उंद्रे यांनी यावेळी जाहीर केले.