लोणी काळभोर : कुंजीरवाडी (ता. हवेली) येथील महात्मा गांधी तंटामुक्ती समितीच्या अध्यक्षपदी रामदास कुंजीर यांची तर उपाध्यक्षपदी सोमनाथ न्हावले व अनिकेत कुंजीर यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.
मावळते अध्यक्ष सचिन कुंजीर यांचा कार्यकाल संपल्यानंतर सदर पद रिक्त झाले होते. अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदासाठी निवडणूक प्रक्रिया कुंजीरवाडी (ता. हवेली) येथील ग्रामपंचायत हद्दीत गुरुवारी (ता. १०) सरपंच अंजू गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या निवडणुकीत अध्यक्षपदी रामदास कुंजीर यांची तर उपाध्यक्षपदी सोमनाथ न्हावले व अनिकेत कुंजीर यांची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली.
दरम्यान, अध्यक्षपदी रामदास कुंजीर यांची तर उपाध्यक्षपदी सोमनाथ न्हावले व अनिकेत कुंजीर यांची निवड झाल्यानंतर ग्रामपंचायतीच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी ग्रामस्थांनी गुलालाची उधळून आनंद व्यक्त केला.
यावेळी कुंजीरवाडीच्या सरपंच अंजु गायकवाड़, माजी सरपंच सरपंच संतोष कुंजीर, शिवसेना शिरुर हवेली संघटक स्वप्निल कुंजीर, श्रीनाथ पतसंस्थेचे अध्यक्ष संदीप धुमाळ, सोसायटीचे अध्यक्ष दादा धुमाल, माजी तंटामुक्ती अध्यक्ष सचिन कुंजीर, बापू घुले, पोलीस पाटील मिलिंद कुंजीर, ग्रामविकास अधिकारी बाळासाहेब कांबळे, विभागप्रमुख सुभाष कुंजीर, भाऊसाहेब कुंजीर, दत्तात्रय कुंजीर, गणेश कुंजीर, अमर कुंजीर, नंदकुमार कुंजीर, संतोष शिंदे आदी उपस्थित होते.