Raj Thakrey News : दापोली : आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुका स्वबळावर लढणार की अन्य पक्षांशी हातमिळवणी करून एकत्र लढणार, असा प्रश्न मनसे नेते राज ठाकरे यांना कोकण दौऱ्यादरम्यान विचारण्यात आला. या प्रश्नाचे उत्तर राज ठाकरे यांनी स्पष्ट शब्दांत दिले आहे.
मी कुणासोबत जाईन हे मला वाटत नाही
राज ठाकरे म्हणाले की, सध्या राजकारणात जे काही सुरू आहे, त्यामुळे मी कुणासोबत जाईन हे मला वाटत नाही. युती आणि आघाडीची शक्यता राज ठाकरे यांनी फेटाळली असून, स्वबळावरच लढणार असल्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत. (Raj Thakrey News) कोणत्याही निवडणुकीत एकच भूमिका असते. एका जिल्ह्यासाठी एक आणि दुसऱ्या जिल्ह्यासाठी दुसरी अशी भूमिका नसते, असेही राज ठाकरे यांनी स्पष्ट केले.
राज ठाकरे म्हणाले की, येत्या १० ते १५ दिवसांत मी मेळावा घेणार आहे. या वेळी मी जे काय आहे ते स्पष्ट सांगणार आहे, असंही त्यांनी स्पष्ट केलं.(Raj Thakrey News) त्यामुळे राज ठाकरे महाराष्ट्राच्या राजकीय परिस्थितीवर काय बोलतात? भाजप आणि राष्ट्रवादीच्या घरोब्यावर काय बोलतात? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
महापालिकांच्या रखडलेल्या निवडणुकांबाबत देखील राज ठाकरे यांनी भाष्य केले. ठाकरे म्हणाले की, हम करे सो कायदा अशी सध्याची स्थिती आहे. दोन-तीन वर्षे निवडणुका प्रलंबित आहेत, ही गंभीर बाब आहे. (Raj Thakrey News) जोपर्यंत लोक रस्त्यावर उतरत नाहीत, तोपर्यंत हे लोक वठणीवर येणार नाहीत, असंही ते म्हणाले. तसेच मुंबई महापालिकेतील भ्रष्टाचार बाहेर येतात यात नवीन काय? असंही त्यांनी सांगितलं.
मनसेची बांधणी करण्यासाठी दर महिन्याला कार्यशाळा सुरू राहतील. (Raj Thakrey News) कार्यक्रम कसे राबवले जातात, कोण किती काम करतं, हे पाहूनच ते लोक पदावर राहतील, असा इशाराही त्यांनी या वेळी दिला.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Pune News : छगन भुजबळ धमकी प्रकरणात नवीन ट्विस्ट; तरुणाला केलेली अटक बेकायदा!
Pune News : दाजीच्या खून प्रकरणातील आरोपीस जामीन मंजूर ; ॲड. सुधीर पाटील यांचा प्रभावी युक्तिवाद