दीपक खिलारे
इंदापूर : पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या पुणे जिल्हा युवक कार्याध्यक्षपदी राहुल सोनवणे तर इंदापूर तालुकाध्यक्ष पदी सुनिल सोनवणे यांची निवड करण्यात आली. या निवडीचे पत्र पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष जयदीप कवाडे यांच्या हस्ते देण्यात आले.
यावेळी कपिल लिंगायत, पुणे जिल्हाध्यक्ष प्रकाश भालेराव, पश्चिम महाराष्ट्र महिला अध्यक्षा लताताई शिरसाठ, सचिन गायकवाड, खंडू शिंदे, दादा जगताप, तेजस जगताप, सचिन शिंदे आदी उपस्थित होते.
पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रा. जोगेंद्र कवाडे, राष्ट्रीय कार्याध्यक्ष जयदीप कवाडे यांच्या मार्गदर्शनाखाली इंदापूर तालुक्यात आणखी जोमाने पक्ष वाढीसाठी प्रयत्न करणार आहे. तसेच नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी सदैव तत्पर राहणार आहे. असे निवडीनंतर बोलताना नवनिर्वाचित तालुकाध्यक्ष सुनिल सोनवणे यांनी सांगितले आहे.