(Rahul Kul ) दौंड, (पुणे) : दौंड तालुक्यातील ग्रामीण मार्गांच्या दुरुस्तीसाठी राज्याच्या अर्थसंकल्पात सुमारे २७ कोटी रुपयांचा निधी मिळाला असल्याची माहिती दौंडचे आमदार ॲड. राहुल कुल (Rahul Kul) यांनी दिली.
राज्यातील ग्रामीण मार्गाच्या दुरुस्तीसाठी यापूर्वी फक्त जिल्हा नियोजन समितीकडून निधी उपलब्ध होत होता. ग्रामीण मार्गाच्या दुरुस्तीचा असलेला अनुशेष भरून काढण्यासाठी राज्याच्या अर्थसंकल्पात या ग्रामीण मार्गच्या कामासाठी निधी उपलब्ध करून द्यावा अशी मागणी दौंड तालुक्याचे आमदार ॲड. राहुल कुल यांनी अनेक वेळा विधानसभेत केली होती.
अखेर या पाठपुराव्याला यश आले असून यावर्षीच्या राज्य शासनाच्या अर्थसंकल्पात राज्यातील ग्रामीण मार्गासाठी २७ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध झाला आहे. यामुळे ग्रामीण भागात देखील मजबूत रस्त्यांचे जाळे यामुळे निर्माण होणार आहे.
दौंड तालुक्यातील ग्रामीण मार्गाच्या कामासाठी मिळालेला निधी पुढीलप्रमाणे
देऊळगाव राजे ते कदमवस्ती ते धुमाळ फाटा व धुमाळ फाटा ते बोरीबेल दौंड शुगर रस्ता करणे – २ कोटी
प्रजिमा ९८ केडगाव स्टेशन हंडाळवाडी ते पारगाव रस्ता करणे – २ कोटी
प्रजिमा ७९ मलठण हनुमानवाडी ते इजिमा १०७ ते रामा ५४ रस्ता करणे – २ कोटी
इजिमा १६८ ते सहकारनगर (राहू) रस्ता करणे – १ कोटी,
प्रजिमा ११३ वाळकी ते पिंपळगाव हरिजनवस्तीसह रस्ता करणे – १ कोटी,
कोरेगाव भिवर ते वाळकी रस्ता करणे – १ कोटी,
पारगाव शिरूर सातारा रस्ता ते लिफ्टवस्ती ते पारगाव नानगाव शिव रस्ता करणे – १ कोटी,
यवत ते यादवस्ती रस्ता करणे – १ कोटी,
यवत ते नवलेवस्ती, भरतगाव रस्ता करणे – १ कोटी,
मानकोबावाडी (लाटकरमळा) ते राम 9 ला यवत जवळ मिळणारा रस्ता करणे – ४० लक्ष,
रामा ११९ ते खुपटेवस्ती रस्ता करणे ७५ लक्ष,
हातवळण ते कडेठाण रस्ता ते जगतापवस्ती रस्ता करणे – ५० लक्ष,
कडेठाण ते प्राथमिक शाळा ते मळईवस्ती रस्ता करणे – ५० लक्ष,
राम ६८ ते नाथाचीवाडी रस्ता करणे – ५० लक्ष,
रामा ६८ ते महादेव मंदिर ते तुकाई मंदिर पारगाव रस्ता करणे – १ कोटी,
यवत कुदळेवस्ती ते रामा ११९ ला मिळणारा रस्ता करणे – ५० लक्ष,
प्रजिमा – २९ ते मेमाणेवाडी रस्ता करणे – ५० लक्ष,
राहू, नवलेमळा जोडरस्ता करणे – ७५ लक्ष,
पिलाणवाडी जोडरस्ता रामा ६८ ला मिळणारा रस्ता करणे (राहू पुणे रस्त्यापर्यंत)- १ कोटी,
पिंगळेवस्ती (भांडगाव) ते प्रजिमा ६४ मार्ग रस्ता करणे – ५० लक्ष,
वरवंड – बारवकरवस्ती ते प्रजिमा ९७ ला जोडणारा रस्ता करणे – ७५ लक्ष,
प्रजिमा ६४ ते विजूळावस्ती खोर रस्ता करणे – ७५ लक्ष,
खोर फडतरेवस्ती ते लवांडेवस्ती ढोर्जेवास्ती रस्ता करणे – ७५ लक्ष,
यवत गाडगीळ वस्ती ते ग्रामा 35 जोडणारा रस्ता करणे – ५० लक्ष,
दहीटने ते पिलाणवाडी रस्ता करणे – ५० लक्ष,
राहू उंडवडी ते वाकणवस्ती ते प्रजिमा ११९ रस्ता करणे – ५० लक्ष,
मिरवडी रामा – ६८ ला जोडणारा (राहू पुणे रस्त्यापर्यंत) रस्ता करणे – १ कोटी ५० लक्ष,
जिरेगाव फाटा ते वासुंदे रस्ता करणे – १ कोटी,
नायगाव ते राजेगाव जुना रस्ता करणे ८५ लक्ष,
खामगाव ते तांबेवाडी ते यवत स्टेशन रस्ता करणे – १ कोटी
दरम्यान, या ग्रामीण रस्त्याच्या कामासाठी मिळालेल्या निधीमुळे दौंड तालुक्यातील ग्रामीण भागातील दळणवळण जलद व सोयीस्कर होणार असून, शेतकरी बांधवांना देखील आपला शेतमाल बाजारपेठे पर्यंत पोहोचविण्यासाठी दर्जेदार रस्ते मिळणार असल्याने ग्रामीण भागातील नागरिक समाधान व्यक्त करीत आहेत. या कामाच्या मंजुरीसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांचे सहकार्य लाभले असून, दौंड तालुक्यातील प्रत्येक घटकांचा विकास करण्यासाठी यापुढील काळात देखील प्रयत्नशील राहणार असल्याचे आमदार ॲड. राहुल कुल यांनी यावेळी सांगीतले.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Pune Crime : पुण्यात OLX वरील खरेदी-विक्रीच्या बहाण्याने तब्बल साडेदहा लाखाची फसवणूक!