(Rahul Kul ) पुणे : पाटस (ता. दौंड) येथील भीमा-पाटस सहकारी साखर कारखान्यात भष्ट्राचार झाला असून आमदार राहुल कुल (Rahul Kul) यांनी ५०० कोटींचा मनी लाँड्रीगचा घोटाळा केला आहे. असा गंभीर आरोप ठाकरे गटाचे नेते तथा खासदार संजय राऊत यांनी केला आहे. तसेच राहुल कुल यांची चौकशी ईडी आणि सीबीआय मार्फेत करावी. अशी मागणी राऊत यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्राद्वारे केली असल्याची माहिती ट्विट करून दिली आहे. यामुळे राजकीय वर्तुळात चांगलीच खळबळ उडाली आहे.
राऊतांनी केलेले आरोप कुल यांनी फेटाळले…!
राऊंतांनी केलेल्या आरोपामुळे आमदार कुल यांच्या अडचणीत येणार असल्याची चर्चा चांगलीच रंगली आहे. या राऊतांनी केलेल्या आरोपाला कुल काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. अखेर कुल यांनी प्रसार माध्यमांना प्रतिक्रिया देत राऊतांनी केलेले आरोप कुल यांनी फेटाळले आहेत.
आमदार कुल म्हणाले की, “राजकीय आकसापोटी, सुडबुद्धीनं राऊतांनी हे आरोप केले आहेत. गेल्या २२ वर्षांपासून मी भीमा सहकारी कारखान्याचा अध्यक्ष आहे. कारखाना अडचणीत असताना मी वैयक्तीकरित्या कारखान्याला आर्थिक अडचणी सोडविण्यासाठी प्रयत्न केला आहे. राऊतांनी केलेले आरोप खरेच असतात असे नाही, मी योग्य ठिकाणी याबाबत माझी बाजू मांडणार आहे. अपुऱ्या माहितीच्या आधारे राऊतांनी हे आरोप केले आहेत.”
राऊतांनी केलेल्या आरोपांनुसार आता खरच कुल यांची चौकशी होणार का ?, राजकीय नाट्यामध्ये आता कोणते वळण येणार हे आता पाहावे लागणार आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Pune News : बापरे ! पुण्यात ४ महिन्यांत ४ बिबट्यांचा भुकेने तडफडून मृत्यू