पिंपरी : स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या बद्दल अवमानकारक व खोटा बदनामीकारक इतिहास सांगून सावरकरांचा व हिंदु प्रेमीचा अवमान केला आहे, असे वक्तव्य पिंपरी चिंचवड युवा मोर्चा शहराध्यक्ष संकेत चोंधे यांनी केले आहे.
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी दोन दिवसांपूर्वी वीर सावरकर यांच्यावर टीका केली होती. त्यावर राज्यात जोरदार प्रतिक्रिया उमटल्या. भाजप, मनसे व शिंदे गट राहुल गांधींच्याविरोधात आक्रमक झाले आहेत.
भाजपच्यावतीने तर राज्यभर आंदोलने करण्यात आले. या पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवड शहर भाजपा युवा मोर्चातर्फे आज शहरात राहुल गांधी यांच्या विरोधात “जोडे मारो आंदोलन” करण्यात आले.
यावेळी भाजपा युवा मोर्चा प्रदेश सरचिटणीस अनुप मोरे, प्रदेश सदस्य अजित कुलथे, पिंपरी चिंचवड युवा मोर्चा अध्यक्ष संकेत चोंधे, सरचिटणीस दिनेश यादव, तेजस्विनी कदम, दिपक नागरगोजे, उपाध्यक्ष प्रसाद कास्पटे, राहुल खाडे, शिवराज लांडगे, सतिश नागरगोजे, प्रशांत बाराथे, पंकज शर्मा, जयदिप करपे, जयदेव ढोरे, चिटणीस प्रकाश चौधरी, मंगेश धाडगे, निलेश अष्टेकर, नम्रता माळी, सारिका माळी, मंडल अध्यक्ष सुमित घाटे, सनी बारणे, देविदास तांबे, शिरीष जेधे, विद्यार्थी संयोजक दिगंबर गुजर, सह संयोजक अनिकेत शेलार, सोशियल मिडीया संयोजक विक्रांत गंगावणे व ईतर पदाधिकारी उपस्थित होते.