(Rahul Gandhi) नवी दिल्ली : गुजरातच्या सुरत न्यायालयाने राहुल गांधी यांना दोन वर्षांची शिक्षा सुनावल्यानंतर राहुल गांधी (Rahul Gandhi )आणि काँग्रेससाठी एक आणखीन मोठी धक्कादायक बातमी समोर आली आहे. काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी यांची खासदारकी रद्द करण्यात आली आहे. काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांना कालच दोन वर्षाची शिक्षा सुनावण्यात आली असताना आज पुन्हा एकदा राहूल गांधी यांची खासदारकी रद्द करण्यात आली आहे.
भयानक अंधःकार सुरु झालेला आहे हे राहुल गांधी यांचे लोकसभा सदस्यत्व रद्द करुन मोदी सरकारने अधोरेखित केले आहे….. https://t.co/Fk7dMDn6hn
— Sachin Sawant सचिन सावंत (@sachin_inc) March 24, 2023
मोदी आडनावावरुन केलेल्या विधानप्रकरणी राहूल यांनी सुरत सत्र न्यायालयाने शिक्षा सुनावली…!
मोदी आडनावावरुन केलेल्या विधानप्रकरणी राहूल यांनी सुरत सत्र न्यायालयाने ही शिक्षा सुनावली होती. त्यानंतर राहूल यांची खासदारची रद्द करण्यात आली त्यांच्या साठी हा मोठा धक्का मानला जात आहे. लोकसभा सचिवालयाने ही कारवाई केली असून राहुल गांधी यांची खासदारकी रद्द करण्यात आल्याने काँग्रेसला मोठा फटका बसला आहे.
राहुल गांधी हे केरळच्या वायनाड लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात. मात्र, गुरुवार ( 23 मार्च) कोर्टाने त्यांना दोन वर्षांची शिक्षा सुनावल्यानंतर त्यांच्यावर खासदारकी रद्द करण्याची कारवाई करण्यात आली आहे. लोकसभा सचिवालयाने याबाबत माहिती दिली आहे. यासंदर्भात शुक्रवारी लोकसभा सचिवालयाकडून पत्र जारी करण्यात आले आहे.
काँग्रेस नेते व खासदार राहुल गांधी यांनी २०१९ च्या लोकसभा निडणुकीच्या प्रचारादरम्यान ‘मोदी’ आडनावावरून केलेल्या टिप्पणीवरून सूरत न्यायालयाने मानहानीच्या खटल्यात त्यांना दोषी ठरविले असून दोन वर्षांची शिक्षा सुनावली आहे. ही शिक्षा सुनावल्यानंतर राहुल गांधी यांची खासदारकी रद्द होणार का? याबाबत चर्चा सुरू झाली होती.