Pune University पुणे : सावित्रीबाई फुले विद्यापीठात रॅप साँग चित्रीकरण करण्यावरून वाद सुरू आहे. यासाठी विद्यापीठाने परवानगी दिल्याने विद्यार्थी संघटना संताप व्यक्त करत आहे. असे असतानाच चित्रीकरणास परवानगी दिलेल्याच्या निषेधार्थ आज ( २४ एप्रिल ) अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या ( अभाविप ) कार्यकर्त्यांनी विद्यापीठात आंदोलन केले.
परिषदेच्या बैठकीत घुसून घोषणाबाजी…
अभाविपच्या कार्यकर्त्यांनी व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत घुसून घोषणाबाजी केली. तसेच, आंदोलकांनी कागदपत्रे फाडून ते उधळतानाच विद्यापीठातील दरवाजे आणि खिडक्यांच्या काचाही फोडल्या आहेत. यामुळे आता यावरुन राजकारण तापणार असल्याचे दिसून येत आहे.
#रॅपसाँग प्रकरणी चौकशी सुरू असताना मोठी शैक्षणिक परंपरा असलेल्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या, छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात घुसून धुडगूस घालत केलेल्या तोडफोडी च्या कृत्याचा तीव्र निषेध!
एरवी आपल्या रास्त शैक्षणिक मागण्यांसाठी शांततेच्या मार्गाने आंदोलन करणाऱ्या… pic.twitter.com/Rl2tWJ5qlB— Rohit Pawar (@RRPSpeaks) April 24, 2023
अभाविपच्या विद्यार्थ्यांनी अचानक केलेल्या आंदोलनामुळे विद्यापीठात एकच खळबळ उडाली. या राड्यामुळे कुलगुरूंनी बैठक थांबवली.
अभाविपच्या विद्यार्थ्यांनी घातलेल्या राड्यावर आमदार रोहित पवारांनी संताप व्यक्त केला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी ट्विट करत निषेध केला आहे. “धुडगूस घालणाऱ्यांवर काय कारवाई करणार?”, असा संतप्त सवाल
ट्विटवर रोहित पवारांनी विचारला आहे.
“रॅपसाँग प्रकरणी चौकशी आहे. तरी मोठी शैक्षणिक परंपरा असलेल्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या, छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात धुडगूस घालत केलेल्या तोडफोडीच्या कृत्याचा तीव्र निषेध!” असे त्यांनी नमूद करत संताप व्यक्त केला.