अक्षय भोरडे
Pune News : तळेगाव ढमढेरे, ता. २७ करंदी (ता. शिरुर) सह परिसरात पावसाने हुलकावणी दिल्याने पाण्याची बिकट समस्या निर्माण झालेली असताना ग्रामस्थांनी लोकप्रतिनिधींना निवेदन देत पाणी सोडण्याची मागणी केली होती. या मागणीला यश आले असून प्रशासनाने चासकमान कालव्याला पाणी सोडले आहे. हे पाणी करंदी गावात आल्याने ग्रामस्थांनी चक्क ताशाच्या गजरात पाण्याचे पूजन करत स्वागत केले आहे. (Pune News)
मागणीला यश…
करंदीसह परिसरातील अनेक ठिकाणी विहिरींनी तळ गाठलेला असून पावसाने पाठ फिरवली आहे. शेतकऱ्यांनी शेतात पेरणी केलेली असताना विहिरींना पाणी नसल्याने शेती संकटात सापडलेली आहे. शेतकऱ्यांच्या जनावरांना सुद्धा पाणी नसल्याची स्थिती निर्माण झाली, मात्र काही भागात होणाऱ्या पावसामुळे चासकमान धरण साठ टक्के भरले आहे.
चासकमान कालव्याचे पाणी या भागातील शेतकऱ्यांसाठी सोडावे अशी मागणी राष्ट्रवादी विद्यार्थी कॉंग्रेसचे प्रदेश संघटक जावेद इनामदार यांसह अनेक पदाधिकाऱ्यांनी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे केलोईहोती. तर काही ग्रामस्थ व पदाधिकाऱ्यांनी सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्याकडे मागणी केली होती. (Pune News)
दरम्यान, या मागणीच्या अनुषंगाने प्रशासनाच्या वतीने चासकमान कालव्याला पाणी सोडण्यात आले आहे. पाणी करंदी गावात दाखल होताच राष्ट्रवादी विद्यार्थी कॉंग्रेसचे प्रदेश संघटक जावेद इनामदार, संतोष दरेकर, योगेश ढोकले यांसह आदींनी चक्क ताशाच्या गजरात जल्लोष करत पाण्याचे स्वागत करत पूजन केले आहे. (Pune News)