राजेंद्रकुमार शेळके
Pune News : पुणे : महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमेटी सांस्कृतिक विभागातर्फे एका नविन उपक्रमाला सुरुवात करण्यात आली आहे. या उपक्रमाचे नाव “कला कट्टा” असे आहे. ह्या कलाकट्ट्याची सुरुवात रविवारी (ता. २१) झाली असून प्रत्येक रविवारी मराठी भाषेचे माहेर घर पुण्यातील रमाई उद्यानापासुन सुरुवात करण्यात आली. या सांस्कृतिक कला कट्ट्याचे उद्घाटन सांस्कृतिक विभागाचे प्रभारी माजी खासदार हुसेन दलवाई यांच्या हस्ते करण्यात आले. (Maharashtra Pradesh Congress Committee Cultural Department has started a new cultural “Kala Katta” initiative..!)
यावेळी मुख्य अतिथी म्हणुन महाराष्ट्र प्रदेश सांस्कृतिक विभागाच्या अध्यक्षा विद्या कदम होत्या तर अतिथी म्हणुन सांस्कृतिक विभागाच्या प्रदेश कार्याध्यक्षा फरजाना डांगे, लता राजगुरु मुंबई समन्वयक बोरुडे, राज्य सरचिटणीस राज घलोत व इतर मान्यवर मोठ्या संख्येनी उपस्थित होते. (Pune News ) यावेळी राष्ट्रीय मुष्ठी योध्दा अभिमन्यु सुर्यवंशी यांचा सांस्कृतिक विभागाच्या अध्यक्षा विद्या कदम यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला.
या वेळी डोंबारी समाजाचे कलावंतांनी या कला कट्ट्यात मोठ्या हिरहिरीने भाग घेऊन आपल्या अंगी असलेल्या कलांचे सादरीकरण केले. (Pune News ) यावेळी डोंभारी समाजाचे कलावंत रमेश निवृत्ती जाधव यांना सांस्कृतिक विभागाच्या अध्यक्षा विद्या कदम यांनी डोंबारी समाजाची कला व संस्कृती आपण सांस्कृतिक विभागाच्या माध्यमातुन जपवनुक करणार व त्यांना राष्ट्रीय पातळीवर नेऊन योग्य तो न्याय देण्याचा प्रयत्न करणार असे आश्वासन दिले.
गायक कलाकार संतोष लांडगे तथा गायिका मीरा शिंदे यांनी आपल्या गिताचे सादरीकरण करतांना त्यांच्या गितांवर प्रदेश अध्यक्षा विद्या कदम यांनी स्व: ता नृत्यांचे प्रदर्शन करताच राज्य उपाध्यक्ष शंकर ढवरे यांनी सुध्दा ठेक्यावर ताल धरला. या नंतर कार्याध्यक्षा फरजाना डांगे यांनी स्वहस्तलिखीत कवितांचे वाचन करुन सर्वांना मंत्रमुग्ध केले. (Pune News ) या कला कट्टा कार्यक्रमाचे आयोजन पुणे शहर सांस्कृतिक विभाग अध्यक्ष विठ्ठल गायकवाड यांनी केले होते.
दरम्यान, महाराष्ट्र प्रदेश कांग्रेस कमेटी सांस्कृतिक विभागातर्फे अशाच कला कट्ट्याचे आयोजन महाराष्ट्रातिल प्रत्येक जिल्ह्यात व तालुक्याच्या मुख्य ठिकाणी करण्यात येणार आहे. याचे कारण असे की ब-याच व्यक्तींमध्ये काही ना काही सुप्त गुण दडलेले असतात. परंतु त्यांना त्यांची कला सादर करण्याकरिता मंच उपलब्ध होत नाही. (Pune News ) म्हणुन सांस्कृतिक विभागाने “कला कट्टा” या नावाने नविन उपक्रम सुरु करुन व्यक्तीमध्ये लपलेली कला बाहेर काढुन त्या कलाकारांचा सर्वांगीण विकास करण्याकरिता ह्या कला कट्ट्याचे आयोजन करण्यात आले आहे. तरी सर्व कलावंतांनी या कला कट्ट्याच्या अभिनव उपक्रमांसी जोडून आपला विकास साधावा.