Pune News : पुणे : राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी राष्ट्रवादीमध्ये बंड करून सत्ताधारी शिवसेना-भाजपशी हातमिळवणी केली. त्यानंतर पक्षात उभी फूट पडली. आता अजित पवार यांच्यासोबत किती आमदार आहेत, शरद पवार यांच्यासोबत नेमके किती आमदार आहेत, याची चाचपणी सुरू झाली आहे. अजित पवार गटात ४० आमदार असल्याचा दावा केला जात आहे. आता दोनही गट पुण्यासह राज्यात संघटन मजबूत करण्यासाठी जोरदार प्रयत्न करत असल्याचे चित्र स्पष्ट होत आहे.
संघटन मजबूत करण्यासाठी जोरदार प्रयत्न
दरम्यान, शरद पवार यांनी विविध जिल्ह्यांमध्ये दौरे सुरु केले आहेत. गुरुवारी बीडमध्ये त्यांनी सभा घेत जोरदार शक्तीप्रदर्शन करत बंडखोरांना आव्हान दिले. राष्ट्रवादी काँग्रसमधील अजित पवार यांच्या बंडानंतरची शरद पवार यांची बीडमधली ही पहिलीच सभा होती. शरद पवार आजच्या सभेत काय बोलतात? याची सगळ्यांनाच उत्सुक्ता होती. कारण शरद पवार मागच्या आठवड्यात त्यांचे पुतणे अजित पवार यांना भेटले होते. (Pune News) त्यावरुन मोठ्या प्रमाणावर शरद पवार यांच्या भूमिकेबद्दल राजकीय संभ्रम निर्माण करण्यात आला. त्यामुळे शरद पवार काय बोलणार? याकडे राजकीय वर्तुळाते लक्ष लागलं होतं. अखेर शरद पवार यांनी बीडमध्ये आपल्या बीडच्या काही नेत्यांचं कौतुक केलं. यावेळी त्यांनी मंत्री धनंजय मुंडे यांना मोठा इशारा देत खडेबोलही सुनावलं. तसेच त्यांनी भाजपवर प्रचंड घणाघात केला. माझ्या वयाचा मुद्दा काढू नका, असा सवाल त्यांनी केला. या सभेला गर्दीही चांगली होती.
दुसरीकडे अजित पवार यांनी देखील पक्षावर वर्चस्व मिळवण्यासाठी प्रयत्न सुरु केले आहेत. पक्षबांधणीला सुरूवात केली आहे. या माध्यमातून आपल्या गटाचे वर्चस्व निर्माण करण्याचा प्रयत्न अजित पवार गटाकडून केला जात आहे. (Pune News) राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचा कार्यक्रम शनिवारी होत आहे. यावेळी अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, मंत्री दिलीप वळसे पाटील आणि रुपाली चाकणकर उपस्थित राहणार आहेत. यावेळी शहर कार्यकारणी देखील नियुक्त केली जाणार असल्याची माहिती मिळत आहे. अजित पवार गटाच्या रणनितीचा एक भाग म्हणून शनिवारी पक्षातील कार्यकर्त्यांना जबाबदाऱ्या दिल्या जाणार आहेत.
पुणे हे दोन्ही नेत्यांचे होमटाऊन आहे. यामुळे आपला गट वरचढ ठरवण्यासाठी आतापासूनच अजित पवार पक्ष बांधणी करणार आहेत. (Pune News) प्रत्येक विभागावर आपले वर्चस्व असावे, असा प्रयत्न अजित पवार आणि शरद पवार दोन्ही गट करणार आहेत, असे चित्र दिसत आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Pune News : नारायणगाव बायपासजवळ शिवशाही बसला भीषण अपघात; १४ प्रवासी जखमी
Pune News : नागपूर-पुणे विमान उड्डाणासाठी सज्ज होता पायलट… विमानात चढणार, एवढ्यात घडले भयंकर!