Pune News : पुणे : राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी बंडखोरी करून सत्तेत स्थान मिळवल्यानंतर पुन्हा एकदा सक्रिय झाल्याचे पहायला मिळत आहे. दरम्यान, अजित पवार सत्तेत येताच त्यांचे दोन्ही चिरंजीव राजकारणात अॅक्टिव्ह मोडमध्ये आल्याचे पाहायला मिळत आहे. मोठा सुपूत्र पार्थ पवार यांनी यापूर्वी निवडणूक लढवली होती; मात्र, जय पवार राजकारणात सक्रिय नव्हते. आता अजित पवार सत्तेत आल्याने वडिलांच्या मागे दोन्ही मुलं राजकारणात पुन्हा एकदा सक्रिय झाल्याचे चित्र पहायला मिळत आहेत.
राजकीय समीकरणे बदलाच्या चर्चांना उधाण…!
पुण्यात बालेवाडी येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या सतेज करंडक आणि पुणे लीग कबड्डी स्पर्धा २०२३ चे उद्घाटन अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार आणि जय पवार यांच्या हस्ते करण्यात आले. या दोघांनी हनुमानाच्या मूर्तीची पूजा करून, स्पर्धकांसोबत हस्तांदोलन करून स्पर्धेला सुरुवात केली.
महाराष्ट्र राज्य कब्बड्डी असोसिएशन आणि पुणे जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या सहकार्याने आयोजित केलेल्या या स्पर्धेत पुणे जिल्ह्यातील १३ तालुक्यांतील संघ सहभागी झाले आहेत. (Pune News) या स्पर्धेसाठी व्यासपीठावर लावण्यात आलेल्या बॅनरवर अजित पवारांसोबत शरद पवारांचांही फोटो पाहायला मिळाला. त्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आले आहे.
पार्थ पवार यांनी यापूर्वी मावळची निवडणूक लढवली होती. मात्र, जय पवार हे पहिल्यांदाच राजकीय कार्यक्रमात पाहायला मिळाले. या कार्यक्रमाला राष्ट्रवादीचे पदाधिकारी उपस्थित होते. (Pune News) आता अजित पवार यांची दोन्ही मुले राजकारणात सक्रिय होतात की काय, अशी चर्चा सुरू झाली आहे. अजित पवार सत्तेत सहभागी झाल्याने अनेक समीकरणे बदलणार आहेत. मात्र, त्यांची मुले राजकारणात सक्रिय झाल्यास पुणे जिल्ह्यात वेगळेच चित्र पाहायला मिळणार असल्याची चर्चा होत आहे.
दरम्यान, अजित पवार यांनी भाजपसोबत हातमिळवणी केल्यानंतर पत्रकार परिषद घेतली होती. त्यावेळी जय पवार अजित पवारांच्या मागे बसले होते आणि पार्थ पवार सोबतच कामगिरी बजावताना दिसले. त्यामुळे येत्या काळात पवार कुटुंबातील हे दोन सदस्य नव्याने राजकारणात सहभागी होणार असल्याचे दिसत आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Pune News : डॉक्टर पत्नीची कोटयावधी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी डॉक्टर पतीसह एकावर गुन्हा दाखल