Pune News : पुणे : राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी बंड करून सत्ताधारी भाजप-शिवसेनेशी हातमिळवणी केल्यानंतर राष्ट्रवादीच्या गोटात अनेक हालचालींना वेग आला आहे. पुणे जिल्हा हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला आहे. अशातच पक्षात दोन गट पडल्यामुळे राष्ट्रवादीतील नेते आणि विशेषत: कार्यकर्ते अजूनही संभ्रमात आहेत. एकाच पक्षातील नेते आणि कार्यकर्ते आता दोन गटांत विभागले गेले आहेत. पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडली आहे. काही नेते, कार्यकर्ते, पदाधिकारी अजित पवार यांच्या गटात सहभागी झाले आहेत; तर काहीजण शरद पवार यांच्या भूमिकेचे समर्थन करताना दिसत आहेत. मात्र, समोर येऊन भूमिका मांडण्यास पदाधिकारी, कार्यकर्ते नकार देत आहेत. या पार्श्वभूमीवर पुण्यातील राजकीय समीकरणे बदलणार असल्याची चर्चा रंगली आहे.
दीपक मानकर, रुपाली ठोंबरे यांची नावे चर्चेत
शरद पवार यांना कोणाचे समर्थन…
खासदार वंदना चव्हाण, आमदार चेतन तुपे, शहराध्यक्ष प्रशांत जगताप, प्रवक्ते अंकुश काकडे, दीपाली धुमाळ, काका चव्हाण, सायली वांजळे, कमल ढोले पाटील, मृणालिनी वाणी, गणेश नलावडे, किशोर कांबळे, (Pune News) बाळासाहेब रायकर, शरद डबडे, महेश हांडे, कुणाल पोकळे, सुरेखा धनिष्ठे, विक्रम जाधव यांच्यासह इतर नेते हे शरद पवार यांच्यासोबत आहेत.
कोण आहेत अजित पवार समर्थक…
आमदार सुनील टिंगरे, राजलक्ष्मी भोसले, दीपक मानकर, आनंद आलकुंटे, दत्ता धनकवडे, युवराज बेलदरे, प्रकाश कदम, बाबूराव चांदेरे, सुभाष जगताप, महेंद्र पठारे, प्रमोद निम्हण, (Pune News) बाळासाहेब बोडके, विनोद आरसे, अनिस सुंडके, सुनीता मोरे, सदानंद शेट्टी, विकास दांगट, बाबा धुमाळ, गणेश घुले, प्रशांत म्हस्के, शंकर केमसे, रोहिणी चिमटे आणि इतर नेते अजित पवार यांच्या गटात आहेत.
दरम्यान, नेते, कार्यकर्त्यांमध्ये उभी फूट पडल्यानंतर आता अजित पवार गटाकडून पुणे शहराध्यक्ष पदासाठी नावांची चर्चा सुरू झाली आहे. (Pune News) पुणे राष्ट्रवादी काँग्रेस शहराध्यक्षपदी दीपक मानकर यांची वर्णी लागण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे. आज दुपारी मानकर यांच्या नावाची अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे. तर महिला शहराध्यक्षपदी रूपाली ठोंबरे यांची वर्णी लागण्याची शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त होत आहे. अजित पवार गटाकडून पुण्यात शहर कार्यालयासाठी जागेचा शोध सुरू आहे.
राष्ट्रवादीच्या सध्याच्या पुणे शहर कार्यालयावर अजित पवार गट दावा करणार नाही, अशी माहिती सूत्रांकडून मिळत आहे.