Printing Of 2000 Notes Stopped : मुंबई : रिझर्व बॅंक ऑफ इंडिया आरबीआयने 2 हजारांची नोट चलनातून बाद करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. २ हजारच्या नोटांची छपाई बंद होणार आहे. सध्या बाजारात असलेल्या नोटा वैध राहणार आहेत. मात्र आरबीआयकडून आता यापुढे 2000 च्या नोटा छापल्या जाणार नाहीत.(Printing Of 2000 Notes Stopped)
2 हजार रुपयांच्या नोटांचं सर्क्युलेशनही बंद करण्याचा निर्णय
क्लीन नोट पॉलिसीअंतर्गत आरबीआयने 2 हजार रुपयांच्या नोटांचं सर्क्युलेशनही बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे नागरिकांनी बँकांमध्ये जाऊन या नोटा बदली करून घेण्याचं आवाहन आरबीआयलकडून करण्यात आले आहे. 30 सप्टेंबरपर्यंत दोन हजार रुपयांच्या नोटा नागरिकांना बदलून मिळणार आहेत. (Printing of 2000 notes stopped; The notes will be exchanged till September 30)
नोव्हेंबर 2016 मध्ये 2000 मूल्याची बँक नोट सादर करण्यात आली होती, प्रामुख्याने सर्व 500 आणि 1000 च्या बॅंक नोटांची कायदेशीर निविदा काढून घेण्यात आली होती. (Printing Of 2000 Notes Stopped)आता यापुढे मात्र 2000 च्या नोटांची छपाई केली जाणार नाही. लोकांना काही एक घाबरण्याचे कारण नाही कारण आता सध्या बाजारात असलेल्या 2000 च्या नोटा वैध आहेत.
बँकांमध्ये 23 मे पासून ही 2000 रुपयांची नोट बदलण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे. नागरिकांना 30 सप्टेंबरपर्यंत नोटा बदलता येणार असल्याची माहिती आरबीआयने दिली आहे.(Printing Of 2000 Notes Stopped) एकावेळी फक्त 2 हजार रुपयांच्या नोटा 20 हजार रुपयांपर्यंत बदलू शकता. यासाठी बँकांना विशेष खिडकी उघडावी लागणार आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
breaking News : ‘लाचेचा गुन्हाही आता मनी लॉंड्रिंग अंतर्गत मानला जाणार; सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय
Breaking News : किरेन रिजिजू यांची कायदा मंत्रिपदावरून हकालपट्टी!