अहमदाबाद : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मातोश्री हिराबेन मोदी यांची प्रकृती अचानक बिघडली असून त्यांना अहमदाबाद येथील यु एन मेहता रुग्णालयात काल (दि. २७) दाखल करण्यात आले आहे. कालच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे बंधू प्रल्हाद मोदी यांच्या गाडीला म्हैसूर येथे अपघात झाला होता.
हिराबेन मोदींनी या वर्षी जूनमध्ये त्यांचा 100 वा वाढदिवस साजरा केला. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांचे पाय धुवून आशीर्वाद घेतले. यानंतर पीएम मोदींनी एक भावनिक पोस्टही लिहिली होती.
पंतप्रधान मोदींच्या आई हीराबेन मोदी यांचे वय 100 वर्षांपेक्षा जास्त असल्याने आरोग्याबाबत अनेक खबरदारी घेणे आवश्यक आहे. त्याची सध्याची प्रकृती काय आहे, आणखी त्याची माहिती सध्यातरी समोर आलेली नाही.
रुग्णालयाने जारी केलेल्या अधिकृत निवेदनात जास्त माहिती देण्यात आलेली नाही. फक्त भरतीबद्दल माहिती दिली आहे आणि हिराबेनची प्रकृती स्थिर असल्याचे सांगितले जात आहे.