पुणे : जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबे यांचे भाषण देत असताना गोळ्या लागून निधन आज निधन झाले. त्यांच्या निधनामुळे जगातील अनेक देशातून हळहळ व्यक्त होत आहे. दरम्यान भारताचे नरेंद्र मोदी यांनी आबे यांना श्रद्धांजलि म्हणून भारतात उद्या ९ जुलै रोजी एक दिवसाचा राष्ट्रीय शोक जाहीर केला आहे.
माजी पंतप्रधान शिंजो आबे यांच्याबद्दलच्या आदरतून आम्ही ९ जुलै ला राष्ट्रीय शोक पाळणार असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट द्वारे जाहीर केले आहे.दोन्ही देशातील संबंध दृढ करण्यात श्री आबे यांचे महत्वाचे योगदान असल्याचेही पंतप्रधान मोदी यांनी म्हटले आहे.
तत्पूर्वी जपानचे माजी पंतप्रधान शिंजो अॅबे यांच्यावरचा हल्ला धक्कादायक आणि निषेधार्ह असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले होते. पंतप्रधानांनी आपल्या ट्विट संदेशात म्हटले होते की “माझे प्रिय मित्र अॅबे शिंजो यांच्यावर झालेल्या हल्ल्याने तीव्र दु:ख झाले. आम्ही आणि आमच्या प्रार्थना शिंजो अॅबे, त्यांचे कुटुंबिय आणि जपानच्या नागरिकांसोबत आहेत.”