मुंबई : वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांचा भेटींचा सिलसिला साध्या सुरूच असल्याचे आज देखील दिसून आले. प्रकाश आंबेडकर यांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
काही दिवसांपूर्वी वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती. त्यानंतर ते एका मंचावर देखील एकत्र आले होते. त्या नंतर प्रकाश आंबेडकर यांनी आगामी निवडणुकीत वंचित बहुजन आघाडी ठाकरे गटासोबत जाणार असल्याचे स्पष्ट देखील केले होते. त्यानंतर त्यांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्याने सर्वत्र चर्चाना सुरुवात झाली आहे.
प्रकाश आंबेडकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली असल्याचे सूत्रांकडून समजते आहे. प्रकाश आंबेडकर आज मंत्रालयात गेले असताना या दोन्ही भेट झाल्याचे सूत्रांनी सांगितले आहे. मिळालेल्या माहितीनुसार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याबाबत चर्चा करण्यासाठी आंबेडकर मंत्रालयात गेले होते.