Haveli पुणे : कृषी उत्पन्न बाजार (Agricultural Produce) समिती (Market Committee) पुणेच्या निवडणूकीसाठी (Pune elections) २८ एप्रिल रोजी मतदान (Voting) होणार आहे. यासाठी मतदार संघ निहाय मतदान केंद्रे जाहीर झाली (polling stations) आहेत. एकुण १८ जागांसाठी १७ हजार ८१२ जण मतदान करणार आहेत. सर्वाधिक सेवा सहकारी संस्था गटातून ११ उमेदवार निवडून (candidates will be elected) येणार आहेत. (Haveli)
याबरोबरच ग्रामपंचायात गटातून ४, व्यापारी/आडते गटातून २ आणि हमाल मापाडी गटातून १ उमेदवार विजयी होणार आहेत. निवडणूक निर्णय अधिकारी प्रकाश जगताप यांनी याबाबत माहिती दिली.
दरम्यान व्यापारी/आडते गटात सर्वाधिक चुरस आहे. सर्वाधिक मतदार आहेत. निवडणूकीसाठी दोन पॅनेल झाले आहेत. मात्र, व्यापारी गटात पॅनेलने कोणालाही पाठींबा दिलेला नाही. इथे दोन-दोन उमेदवारांनी पॅनेल बनविला आहे.
मतदानाचे ठिकाण
सेवा संस्था व ग्रामपंचायत – श्री संदीप माणिकराव सातव पाटील इंग्लिश मिडीयम स्कुल, अरणेश्वर तळजाई रोड
व्यापारी/आडते – शुक्रवार पेठ येथील शिवाजी मराठा हायस्कुल
हमाल/तोलणार – मार्केट यार्ड येथील हमाल पंचायत भवन
आणखी बातम्या वाचण्यासाठी..
Election : हवेली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत ‘त्या’चार उमेदवारांचे अर्ज कायम